Advertisment
Jalna DistrictRanraginiजालना जिल्हाराज्य

रणरागिनी ;बायको मी नवसाची! एक लिटरचा स्टो आणि पाच पत्री डालड्याच्या डब्यामध्ये सुरू केला संसार ;वडिलांच्या संस्कारामुळे आहे आज वैभव-सौ.विद्या कुलकर्णी

जालना-“बायको मी नवसाची”आणि मलाही हवा असणारा काळा सावळा पती मिळाला” अशी दिलखुलास कबुली दिली आहे 1984 ला विवाह झालेल्या आणि 1989 जुना जालना महिला मंडळ मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती विद्या सुरेशराव कुलकर्णी यांनी . पूर्ण सदस्य महिला असलेल्या या संस्थेची जुना जालना भागात दलित वस्तीमध्ये बालविकास प्राथमिक शाळा आहे . या शाळेने आदर्श शाळा पुरस्कार देखील प्राप्त केलेला आहे. सौ.कुलकर्णी यांचं लग्न झालं त्यावेळी घरामध्ये एक स्टो, आणि पाच रिकाम्या झालेल्या डालड्याचे पत्र्याचे डब्बे एवढाच संसार होता. घरामध्ये सात-आठ व्यक्ती असतानाही खिचडी शिजवायला देखील पातेलं नव्हते,  ते घरमालकांकडून मागून  घ्यावे लागायचे एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये दिवस काढले. परंतु वडिलांनी घालून दिलेल्या संस्कारांमुळेच आज इथपर्यंत पोहोचले आहे. अशी कृतज्ञतापूर्वक कबुली सौ. विद्या कुलकर्णी यांनी  दिली.नवरात्रोत्सवानिमित्त Edtv News च्या  “रणरागिनी 2023” या उपक्रमात तिसरे पुष्पगुंपताना त्या बोलत होत्या.

रणरागिणीला प्रतिकिया द्या-9423523259

शैक्षणिक वारसा त्यांना वडिलांकडूनच आला .घरी पाच बहिणी असल्यामुळे वडिलांचे फारसे काही लक्ष देणे होत नव्हते, मात्र संस्कार करण्यात ते कमी पडले नाहीत .जत्रेत गेल्यानंतर चप्पल साठी हट्ट धरल्यावर घरी आल्यानंतर रागावले जरूर ,परंतु पुन्हा असा हट्ट करू नकोस असेही खडसावले .मुलाखतीमध्ये सौ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, माझ्या लग्नासाठी वडिलांनी सुरेश कुलकर्णी यांचे ठिकाण पाहिले ते होतकरू होते एवढाच गुण वडिलांनी पाहिला ,परंतु नातेवाईकांनी या मुलाकडे संपत्ती नाही, फक्त गुणवत्ताच आहे असे म्हणून विवाहासाठी बंधने आणली होती.  सुरेश कुलकर्णी हे राजूरच्या गणपतीचे भक्त असल्यामुळे त्यांनी गणपतीला माझ्यासाठी नवस केला   आणि त्याचं फलित म्हणून त्यांचा माझ्यासोबत विवाह झाला आणि मी नवसाची बायको झाले.

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जुना जालना महिला मंडळ पदाधिकारी ,पेशवा युवा मंचचे अध्यक्ष, आणि बाल विकास शाळेत कोषाध्यक्ष तथा अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत.तसेच घरी अंतरवलीला श्रीराम संस्थान आहे. त्यामुळे श्रीरामांची कृपा आणि गुरूंचे आशीर्वाद यांच्यामुळेच भरभराट झाली आहे.

नवरात्रोत्सवाच्या संकल्पनेबद्दल सांगताना सौ. विद्या कुलकर्णी म्हणाल्या “माझ्यावर कधी रणरागिनी होण्याची वेळ आली नाही, परंतु रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होत असेल तर धावून जाण्याची माझ्यात ताकद आहे, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीमध्ये नारीशक्ती निर्माण केली पाहिजे. त्यासाठी नवरात्रात महिलांवर संस्कार होण्याची गरज आहे. महिलांवर संस्कार झाल्यानंतर तिने आपल्या मुलीवर संस्कार करण्याची गरज आहे .नवरात्राच्या निमित्ताने मुलीला जवळ घेऊन देवाजवळ बसून तिच्यावर संस्कार करावेत ते दीर्घकाळ टिकतील. सद्य परिस्थितीत नवरात्रोत्सवामध्ये महिलांना मिळत असलेले स्वातंत्र्य ही चांगली बाब आहे ,परंतु त्यामध्ये मर्यादा असाव्यात ,आज कालच्या महिलांची मात्र मर्यादा आणि बंधने पाळण्याची मनस्थिती दिसत नाही. माझ्या घरापुरते मी हे काटेकोर पाळण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर वडिलांनी केलेले संस्कार त्यावेळी ते कडक वाटले पण आज ते खरे उपयोगात आले आहेत. हेच संस्कार पुढे सुनेला आणि सुनेच्या माध्यमातून नातीवर करण्याचा प्रयत्न करत आहे. जीवन यशस्वी व्हायचे असेल तर कडक संस्कारातूनच पुढे जावे लागेल आणि ऍड. सुरेश कुलकर्णी यांचा परिवार पुढे नेण्यामध्ये माझ्या वडिलांनी केलेले संस्कार कामाला आले आहेत.

edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. दहावी पास साठी नवस करणारी कोणती महिला झाली IAS, कोण आहे नवसाची बायको? ….आणि बरंच कांही.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button