वारे पठ्ठ्या ! एक कोटींच्या “बक्षीशी”सोबत मिळाले हातकड्यांचे बक्षीस!
नाशिक- बक्षीस मागून मागायचे तर चांगलेच मागितले पाहिजे, असा विचार करत एका कंत्राटदाराच्या मागच्या कामाचे देयक दिल्याच्या बदल्यात आणि चालू देयक मागील तारखेत काढून देण्याच्या बदल्यात तब्बल एक कोटींचे “बक्षिस” मागणाऱ्या वर्ग एक आणि वर्ग दोन अशा दोन अधिकाऱ्यांच्या हातात एक कोटी सोबतच दोन हातकड्या ही पडल्या आहेत. नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
हजार दोन हजार, पाच हजार ,एक लाखापर्यंत लाच मागणे किंवा बक्षीस मागणे हे प्रकार काही नवीन नाहीत, मात्र तब्बल एक कोटींची लाच न मागता बक्षिशी असा गोंडस शब्द वापरून कंत्राट दाराकडून एक कोटींची मागणी करणारे गणेश वाघ वर्ग एक तत्कालीन उपविभागीय अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग अहमदनगर सध्या कार्यकारी अभियंता म्हणून धुळे येथे कार्यरत आहेत त्यांचा एक सहकारी श्री गायकवाड व 32 सहाय्यक अभियंता वर्ग 2 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग अहमदनगर येथे कार्यरत आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराने अहमदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये 1000 मिलिमीटर व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामाची निविदा भरली होती. या निविदेनुसार 31 कोटी 57 लाख 11 हजार 995 रुपयाच्या पाच टक्के अनामत रक्कम भरावी लागते. त्यानुसार एक कोटी 57 लाख 85 हजार 995, पूर्वी केलेल्या कामाची सुरक्षा ठेव असलेली 94 लाख 71 हजार पाचशे रुपये, केलेल्या कामाचे अंतिम देयक 14 लाख 41 हजार 749 रुपये असे एकूण दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रुपयांचे देयक कंत्राटदाराला या महामंडळाकडून घेणे आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ वर्ग एक यांची धुळे येथे कार्यकारी अभियंता म्हणून बदली झाली. त्यामुळे रखडलेल्या या देयकावर मागील तारखेचा आवक जावक क्रमांक टाकून तसेच मागच्या तारखेत गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गायकवाड याने दिनांक 20 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराकडे एक कोटींच्या “बक्षिसाची” मागणी केली. परंतु तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली आणि या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक तीन रोजी एक कोटी रुपयांचे बक्षीस स्वीकारताना त्यांचे दोन्ही हातही स्वीकारले आणि गायकवाड याला रंग हात पकडले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172