मोक्यच्या वर्षात “संस्कृतीचं” पदार्पण! तुम्ही पण या तिच्या स्वागताला
जालना; काळ कोणासाठीही थांबत नसतो ,असंच काहीसं घडलं आहे “संस्कृतीच्या” बाबतीत. 2008 मध्ये जन्म घेतलेली ही संस्कृती कोविडमध्ये दोन वर्ष काहीशी हिरमुसली होती खचली नाही. 2022 मध्ये गायक महेश काळे यांनी पुन्हा या संस्कृतीच्या स्वागताला हजेरी लावली. पहाटेचा सूर्योदय ज्याप्रमाणे पुन्हा नवीन संकल्पना ,तेजोमय पहाट घेऊन आपल्या समोर येते तशाच पद्धतीने पुन्हा ही संस्कृती सोळा वर्षे पूर्ण करून सतराव्या वर्षात म्हणजेच धोक्याचं वर्ष संपून मोक्याच्या वर्षात पदार्पण करण्यासाठी आपल्या भेटीला येत आहे.
“संस्कृती मंच” जालना यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी पहाट या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं .2008 मध्ये या कार्यक्रमांना सुरुवात झाली. कोविड ची दोन वर्ष सोडता सलग सोळा वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. आत्तापर्यंत 14 कार्यक्रम या मंचचे झाले आहेत .एकापेक्षा एक दिग्गज कलाकार “पहाटेच्या संस्कृतीला” हजेरी लावून गेले. त्यामध्ये पंडित अजित कडकडे, चारुदत्त आफळे, महेश काळे, पंडित शौनक अभिषेकी ,रघुनंदन पणशीकर यांचा समावेश होता. यावर्षी देखील गुरुवार दिनांक 9 रोजी पहाटे प्राजक्ता जोशी, ऋषिकेश कानडे ,अभिलाषा चेलम या गायकांच्या सुरेल मैफिलीने दिवाळीच्या पहाटेचा प्रारंभ होणार आहे . कोणतंही स्वागत मूल्य, तिकीट दर नसलेला हा विनामूल्य कार्यक्रम रसिकांच्या आयुष्यात एक अविस्मरणीय क्षण ठरू शकतो. कुठलेही मूल्य द्यायचे नसले तरीही नियोजनाच्या व्यवस्थेमुळे आरती फूड्स शनी मंदिर, हॉटेल मधुबन शिवाजी पुतळा आणि अभिजीत क्लासेस येथे या कार्यक्रमांचे पासेस उपलब्ध आहेत.
हे आहेत “संस्कृतीचे” पालक;संस्कृती मंच सदस्य,किशोर देशपांडे,अनिल कुलकर्णी,गिरीश राखे,मकरंद दाभाडकर,दिलिपदेशपांडे,संजय देशमुखप्रकाश आचार्य,संजय देशपांडे,शाम कुलकर्णी,सुनिल कुलकर्णी,राजेश कल्याण,राजेंद्र देशपांडे,जयंत दाभाडकर,धनंजय पाटील,
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172