जालना-नवीन जालना भागातील गणपती नेत्रालयासमोर असलेल्या सोमेश रेसिडेन्सी या उच्चभ्रू वस्तीमध्ये दि.4 डिसेंबर ला दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीन लाखांच्या जवळपास सोने चांदी आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला होता.या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेने लावला आहे.खरं तर आरोपींना दोन दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले होते.परंतु त्यांच्या कडून मुद्देमाल हस्तगत करणे बाकी होते. आज तो हस्तगत केल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन तपसांदर्भात सविस्तर माहिती दिली. दहा जणांच्या ठोक्याने ही चोरी केली होती आणि सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. यापैकी जमुना नगर मधील एका आरोपीने याच भागात असलेल्या एका किराणा दुकानदाराची अडीचशे रुपयांची उधारी ही चूकती केली होती.
दिनांक 4 डिसेंबर रोजी भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच धसकी भरली होती .दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत असताना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसत असलेल्या तिघांन दोन दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले होते. मात्र त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त होत नव्हता .त्यामुळे हा तपास लांबला होता. तपासा दरम्यान आरोपी कुलदीप उर्फ जजू अंबादास जगधने वय 21 वर्षे राहणार जमुना नगर ,योगेश गणेश गायकवाड वय 22 वर्ष राहणार जमुना नगर, विकास उर्फ विकी प्रकाश लोंढे व 22 वर्ष राहणार लहुजी नगर चौक नूतन वसाहत, या तिघांना ताब्यात घेतले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हे तिघेजण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसत होते. हा मुद्देमाल लंपास करण्यामध्ये या तिघांचा सक्रिय सहभाग होता आणि कविता शर्मा यांच्या घरात जाऊन गावठी पिस्तुलाचा भाग दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. ज्यामध्ये रोख रक्कम दोन लाख रुपये सोने चांदीचे दागिने ,दोन मोबाईल चांदीचे शिक्के, असा ऐवज होता. यापैकी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना रोख 47 हजार रुपये, दोन मोबाईल ,चांदीचे 30 हजाराचे शिक्के, असा एकूण दोन लाख 81 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे .यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासह उपाधीक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, यांच्यासह स्थानिक गुना शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी गोकुळसिंग कायटे,कृष्णा तंगे, सचिन चौधरी ,संजय सोनवणे ,आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या टोळीतील इतर सात जणांमध्ये शेख आरेफ शेख मुख्तार ,राहणार जमुना नगर, दिनेश दत्तात्रय पवार, योगेश प्रकाश हांडे राहणार सतकर नगर, कल्याण भोजने राहणार सतकर कॉम्प्लेक्स च्या मागे बाळू सरोदे आणि इतर दोन अशा दहा जणांचे हे टोळके होते. या तिघांपैकी एका आरोपीची एका किराणा दुकानदाराची अडीचशे रुपयांची उधारी होती ती त्याने या पैशातून चुकती केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172