गजानन तौर यांची भर चौकात भर दिवसा गोळ्या घालून हत्या
जालना- विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गजानन तौर या तरुणाची आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना शहरात भर चौकात भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. 2024 रोजी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते हे विशेष.
याच कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते आपल्या काही सहकाऱ्यांसह उभे होते .याच वेळी मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सुमारे पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या त्यापैकी एक गोळी डोक्यात आणि दोन गोळ्या पाठीमध्ये लागल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. हल्लेखोरांपैकी दोन हाल्लेखोर हे जालन्यातील आणि एक हल्लेखोर हा हा बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. हा गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत .घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान गजानन तौर यांना जखमी अवस्थेतच त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील कलावती हॉस्पिटल येथे भरती करण्यासाठी नेले होते परंतु तिथे भरती न झाल्यामुळे त्यांनी शहरातील दीपक हॉस्पिटल येथे नेले आणि तेथे देखील डॉक्टरांनी प्राथमिक माहिती घेऊन त्यांना सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्या अनुषंगाने त्यांच्या सहकाऱ्यांनी सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्ह्यामध्ये पसरली आणि गजानन तौर यांचे मित्र मंडळ सामान्य रुग्णालयामध्ये गर्दी करू लागले. तर यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे, कारण गोळी लागल्यानंतर चे जे शाविच्छेदन असते ते इन कॅमेरा करावे लागते आणि ही सुविधा जालना येथे नाही.
घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने माखलेला एक चाकू आणि मृत काडतुसे जप्त केले आहेत .दरम्यान गजानन तौर यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत त्यापैकीच एक संघटित गुन्हेगारीचा दाखल होता आणि त्या प्रकरणात त्यांना स्थानबद्धही केले होते त्यामुळे या प्रकरणातील काही दिवस त्यांनी शिक्षाही भोगलेले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172