याच शिक्षकांवर शिक्षण विभागाची वारंवार मेहरबानी का? शाळा व्यवस्थापन संघर्ष समितीचा सवाल; उपोषण सुरू
जालना- जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार आणि हितसंबंध हे काही नवीन नाहीत. परंतु याच शिक्षकांवर शिक्षण विभाग वारंवार का मेहरबान होत आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करून शाळा व्यवस्थापन संघर्ष कृती समितीच्या वतीने या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
गट साधना केंद्र परतुर येथील गैरकारभाराची चौकशी झाली त्याचा अहवाल ही मिळाला मात्र अद्याप पर्यंत संबंधितावर काहीच कारवाई झाली नाही या केंद्राचे समन्वयक के एस बागल यांना अवैधरीत्या आदर्श शिक्षक पुरस्कार दिला एवढेच नव्हे तर दहिफळ खंदारे येथे नियुक्ती असताना त्यांना गेल्या पंधरा वर्षांपासून गटसांधना केंद्र येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या चौकशीसह त्यांची आत्तापर्यंत बदली कशी झाली नाही याची चौकशी करावी कस्तुरबा गांधी विद्यालय परतुर येथे खरेदी होत असलेल्या अन्नधान्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना पुरविली जाणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता तपासून पहावी बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील प्रतिनियुक्त वर असलेले शिक्षक ईश्वर तुकाराम गाडेकर तसेच जालना शहरात जिल्हा परिषद प्रशाला कन्या या शाळेवर अतिरिक्त शिक्षक कार्यरत असल्यामुळे नियमबाह्य पद्धतीने ईश्वर गाडेकर यांची पत्नी यांची केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी या आणि अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापन संघर्ष कृती समितीच्या वतीने नामदेव धुमाळ हे या आमरण उपोषणाचे नेतृत्व करत आहेत तर या कृती समितीचे पदाधिकारी अमोल राधाकिसन चव्हाण, बाबुराव धोंडीबा चव्हाण, गजानन कडूबा थेटे, परमेश्वर दिगंबर चव्हाण, हनुमंत पहाडे, देविदास राठोड हे त्यांना पाठिंबा देत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172