Jalna Districtजालना जिल्हा
पारसी टेकडीचे पुढे काय झाले?
जालना -जालनेकरांना दोन वर्षांपूर्वी पारसी टेकडी कुठे आहे? हे देखील माहित नव्हतं. परंतु आता जालनेकरांनाच नाहीतर महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना पारसी टेकडी कुठे आहे आणि नेमकी ती कशामुळे नावारूपाला आली आहे हे लक्षात यायला लागलं आहे. त्यामुळे या टेकडीचा विकास झपाट्याने होत आहे.
समस्त महाजन ट्रस्ट यांच्या पुढाकारातून जालन्यातील काही उद्योजकांनी, सुज्ञ नागरिकांनी, पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेऊन पारसी टेकडीचा विकास करण्याचा चंग बांधला. त्यांच्या या प्रयत्नाला शासकीय अधिकाऱ्यांनी देखील तेवढाच प्रतिसाद दिला. अडचण होती ती टेकडीच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीची परंतु कंपन्यांच्या नफ्यामधून सामाजिक दायित्वासाठी राखीव ठेवलेला निधी या सत्कर्मी लागला आणि विविध संस्थांनी मिळून टेकडीच्या विकासाला हातभार लावला. महत्त्वाचा हातभार लागला तो एचडीएफसी बँकेच्या निधीमुळे !खरंतर कोणतीही बँक थेट पैसा देत नाही तीच गोष्ट इथेही घडली, आणि मुंबई येथे असलेल्या केशव सृष्टीला एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला गेला. केशव सृष्टीच्या मध्यस्थीने हा निधी पारसी टेकडीच्या विकासासाठी वापरल्या जात आहे. या बँकेचे सामाजिक दायित्व विभागाचे(CSR) वरिष्ठ व्यवस्थापक क्षितिज शर्मा कंटू यांनी बँकेने दिलेल्या निधीची योग्य वापर झाला आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी काल दौरा केला. त्यांच्यासोबत या बँकेच्या अधिकारी तेजस्विनी हुलसुरकर आणि केशव सृष्टीचे खजिनदार नीलकंठण अय्यर यांचीही उपस्थिती होती.
इथे विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे त्यामध्ये मुख्यत्वे आंब्याच्या झाडांची संख्या जास्त आहे. घनवन प्रकल्प ही साकारल्या जात आहे त्यामुळे सध्या तुरळक प्रमाणात दिसत असलेली हरणे ससे साप हे काही दिवसातच मोठ्या प्रमाणात दिसायला लागतील आणि एक चांगला प्रकल्प इथे उभा राहील असे सध्या चित्र आहे. याबद्दल बोलताना क्षितिष शर्मा यांनी समाधान व्यक्त केलं आहे. दिलेला निधी योग्य तऱ्हेने वापरल्या जात असल्याबद्दल केशर सृष्टीच्या देखभाल करणाऱ्या मंडळींचे देखील कौतुक केले आहे. यामध्ये विशेष कौतुक केले आहे ते उद्योजक सुनील रायठठा यांचे. इथे लावलेला झाडांचे लोकार्पण क्षितिज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जालना एज्युकेशन फाउंडेशन चे संचालक प्राध्यापक सुरेश लाहोटी, पोलाद स्टीलचे संचालक नितीन काबरा, रा.स्व. संघाचे पदाधिकारी राम सुरी, आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक जयमंगल जाधव, विवेक काबरा आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com