मिराबाईंमध्ये प्रखर तेज होते; वा.ल. कुलकर्णी व्याख्यानमालेत मॅक्सवेल लोपीस यांचे मत
जालना -संत मीराबाई या राजपूत घराण्यातून होत्या, बालपणी त्यांनी घरासमोरून नवरदेवाची वरात जाताना पाहिली आणि त्यांच्या आईला त्यांनी माझे पती कोण? म्हणून विचारले आणि त्यांच्या आईंनी श्रीकृष्णाच्या मूर्ती कडे बोट दाखवत हे तुझे पती आहेत असे सांगितले. त्यावेळेस पासून मीराबाईंनी श्रीकृष्णालाच आपले पती मानले मिराबाईंचे बालपण कृष्ण भक्तीमध्ये गेले, त्यामुळे काहीही न करता समोरच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य मीराबाईंमध्ये होते. त्यामुळेच त्यांच्यात प्रखर तेज निर्माण झाले आणि म्हणून असूरी शक्ती त्यांचे काहीही वाईट करू शकल्या नाहीत. असे मत भारतीय शास्त्रीय संगीत आणि संत मीराबाईंचे मराठी चरित्रकार मॅक्सवेल लोपिस यांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थी विकास विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जे.ई. एस. महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वा.ल. कुलकर्णी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. मीरा शामरंगी रंगली या विषयावर हे व्याख्यान होते. कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला जी एस महाविद्यालयाचे सचिव श्रीनिवास बक्कड महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री, उप प्राचार्य महावीर सदावर्ते, डॉ. यशवंत सोनुने, यांच्यासह सरस्वती भुवन महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. मुळे डॉ. नितीन नितीन गादेवाड, डॉ. प्रकाश आंबेकर, डॉ श्रीरामे, डॉ. दिगंबर दाते आदींची उपस्थिती होती.
कोण आहेत वा.ल. कुलकर्णी
ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू आहे त्या वा.ल. कुलकर्णी यांचा परिचय करून देताना महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री म्हणाले” 1959 ला तत्कालीन मराठवाडा विद्यापीठामध्ये सारस्वतांचा गोतावळा जमा झाला. यामध्ये विद्यापीठाचे पहिले मराठी विभाग प्रमुख म्हणून वामन लक्ष्मण कुलकर्णी यांची निवड झाली. त्याच वा.ल. कुलकर्णी यांच्या नावाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172