प्रजासत्ताक दिन विशेष: पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण, पोलिसांनी दिली मानवंदना 2) पार्थ सैनिक शाळेच्या मुलांची लक्षवेधी मल्लखांब प्रात्यक्षिक 3) पोलिसांची वाढली ऐट, 26 चार चाकीआणि 15 नव्या कोऱ्या गाड्या दिमतीला
जालना- जिल्ह्यामध्ये प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस कवायत मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉ .कृष्णा पांचाळ ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना ,पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यामध्ये पार्थ सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब च्या कसरती सादर केल्या उपस्थित नागरिकांनी याला चांगली दाद दिली.
पोलीस प्रशासनाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या कामामध्ये गती आणण्यासाठी 25 नवीन चार चाकी वाहने आणि पंधरा नवीन दुचाकी वाहने पोलीस दलात दाखल झाले आहेत. याचे हस्तांतरणही पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची आता ऐट वाढली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172