महिला दिनविशेष ;महिलांनी राजकारणात यावे परंतु …-माजी आमदार शकुंतला शर्मा
जालना- दिवसेंदिवस राजकारणाची पातळी खालावत चालली आहे, त्यामुळे महिला राजकारणात येण्याचे टाळत आहेत, महिलांनी आवर्जून राजकारणात यावे परंतु “दीन” राहू नये ,याच सोबत राजकारण करत असताना कुटुंबापर्यंत हे राजकारण पोहोचवू नये असे आवाहन माजी आमदार शकुंतला शर्मा यांनी केले आहे.
1980 ते 85 दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील काँग्रेसचे आमदार म्हणून शकुंतला शर्मा यांनी काम केले .व्हायचे होते खासदार मात्र बाळासाहेब पवार यांच्या तिकिटासाठी त्यांना तडजोड करावी लागली आणि नंतर बदनापूर विधानसभेचे तिकीट मिळाले.इंदिरा काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडूनही आल्या. त्यावेळी मराठवाड्यातील मतदार संघामध्ये केवळ तीनच महिला आमदार होत्या त्यामध्ये रजनी सातव हिंगोली, सूर्यकांता पाटील हादगाव आणि शकुंतला शर्मा बदनापूर. श्रीमती शर्मा या जालना जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये आमदार झालेल्या एकमेव महिला आमदार माजी आमदार आहेत. विद्यमान आमदार असताना शेवटचं एक वर्ष बाकी असताना पतींचे झालेलं आपत्कालीन निधन त्यामुळे परिवाराची पूर्ण जबाबदारी श्रीमती शर्मा यांच्यावर येऊन पडली तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. लहान मुलगा चार वर्षांचा असतानाच सर्व जबाबदारी शर्मा यांनी आपल्यावर घेतली. आज उच्चशिक्षित कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. आजही त्यांचे त्यांची मुलं- मुली विदेशात आहेत. दरम्यान राजकारण हे वाईट नाही परंतु आजची महिलांची संख्या ही विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे महिलांनी आवर्जून राजकारणात यावं असा आवाहन त्यांनी केला आहे. परंतु महिला का राजकारणात येत नाहीत? या प्रश्नाला उत्तर देताना श्रीमती शर्मा म्हणाल्या” सध्या परिस्थितीत राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. राजकारण सोडून कुटुंबातील इतर सदस्यांवर वैयक्तिक टीका केली जात आहे, जी समाजासाठी आणि या नेत्यांच्या कुटुंबासाठी देखील घातक आहे. सुज्ञ आणि संस्कृत महिलांसाठी राजकारणात आता वाव नाही. भ्रष्टाचाराचे आरोप देखील होत आहेत त्यामुळे महिलांनी आपली संस्कृती जपत कुटुंबावर टीका टिप्पणी न करता आणि आपल्याला कुटुंबावर झालेली टीका टिप्पणी न सहन करता हिम्मत दाखवून राजकारणात यावे ,कारण महिलांमधील विकासाची आणि काम करण्याची गती ही पुरुषांमध्ये नाही. महिला जर राजकारणात आल्या तर निश्चितच समाज चांगल्या पद्धतीने सुधारू शकतील. महिला जरी राजकारणात कमी असल्या तरी इतर उपक्रमांच्या माध्यमातून त्या नेहमीच अग्रेसर आहेत असेही त्या म्हणाल्या. त्यांचे विचार ऐकण्यासाठी पहा सविस्तर मुलाखत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172