जालना- मुलींचा घटत चाललेला जन्मदर वाढविण्यासाठी शासनाने जुन्या योजनेत बदल केला असून आता एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या लेकीसाठी एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील 315 लाभार्थी यासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 301 लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये या रकमेपैकी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ताही जमा झाला आहे.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत एक एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुलींकरता लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पूर्वी दोन मुलींवर हा लाभ होता, परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला आहे .पहिला मुलगा असेल आणि दुसरी मुलगी असेल, तसेच जुळे असेल आणि त्यापैकी एक मुलगी असेल तरीदेखील याचा लाभ मिळणार आहे .मुलगी जन्माला आल्यानंतर नोंदणी झाली की लगेच पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता, मुलगी शाळेत पहिली मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपयांचा दुसरा हप्ता ,ती सहावी मध्ये गेल्यानंतर सात हजार रुपयांचा तिसरा हप्ता ,अकरावी मध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपयांचा चौथा हप्ता आणि अठरा वर्षांची झाल्यानंतर 75 हजार रुपयांचा पाचवा हप्ता. अशी एकूण एक लाख एक हजार रुपयांची रक्कम या मुलीला मिळणार आहे .त्यामुळे लाडकी लेक जन्माला आली असेल तर अंगणवाडी सेविकांमार्फत या मुलीची त्वरित नाव नोंदणी करा.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 372 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 315 लाभार्थी पात्र ठरले आहेत. या पात्र लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांना प्रतिकात्मक धनादेशाचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. कोमल कोरे- चाटे, नवनाथ वामन यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रदान करण्यात आले .तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना 2265 स्मार्ट मोबाइल वाटप करण्यात येणार आहेत. त्यापैकी काही मोबाईलचे आज वाटप करण्यात आले .
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172