जालना- चंचल मनाला एकाग्र करून त्याला स्थिर ठेवण्यासाठी सदवाचन, सत्संगत ,सद्बक्ती ,सत्कार्य, सत्कर्म, या पंचसूत्रीचा अवलंब करावा ,असे आवाहन विचारवंत डॉ. मधुश्री सावजी यांनी केले आहे. दिल्लीशी सलग्न असलेल्या विद्याभारती देवगिरी प्रांत यांच्यावतीने स्व. मधुकरराव गोसावी (अण्णा )यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. हरिभक्त भक्त परायण आनंदगडकर महाराज डॉ. पद्माकर सबनीस सौ .प्रज्ञा तल्हार ,शार्दुल भाले यांची उपस्थिती होती.
पहिल्या गटातील शिक्षकांसाठी” मनाच्या श्लोकातील मनाचे सामर्थ्य “हा विषय देण्यात आला होता तर विद्यार्थ्यांसाठी ” समर्थ रामदास स्वामी” हा विषय होता. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधून सुमारे 300 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये शिक्षकांमधून गुणाानुक्रमे प्रथम डग्लस गर्ल्स हायस्कूलच्या शुभांगी प्रमोद मांजरे ,जिल्हा परिषद मांजरगाव शाळेच्या विशाखा प्रमोद भागवत, गोल्डन जुबली स्कूलच्या मीनाक्षी रामदास देशमुख ,यांनी पारितोषिक पटकाविले. गणपती विद्यालय भोकरदन येथील वैशाली सुरंगळीकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांमध्ये गुणाानुक्रमे प्रथम जे. बी. के. विद्यालय टेंभुर्णी येथील धनश्री नंदू शेळके, संस्कार प्रबोधिनी जालना येथील अभिजीत बाबासाहेब मिसाळ, सेंट मेरी हायस्कूल जालना येथील वेदिका निलेश जोशी, उत्तेजनार्थ संस्कार प्रबोधिनीच्या मंगल वाघमारे आणि अफ्रीन खान खालेद खान यांचा क्रमांक आला आहे. विजेत्यांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण केले गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्माकर सबनीस यांनी केले आणि स्वर्गीय अण्णा यांच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली .पाहुण्यांचा परिचय डॉ. धनश्री सबनीस यांनी करून दिला .कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. आनंदगडकर महाराजांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाचन पर मार्गदर्शन केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172