जयस्वाल बंधूंच्या जोडीने मलकापूर बँकेला लावला नऊ कोटींचा चुना; 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर येथील नगर भूमापन क्रमांक 17 850/2 ही मिळकत स्वतःची नसतानाही दि मलकापूर बँकेला गहाण ठेवून नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिषेक जगदीश जयस्वाल आणि अमरीश जगदीश जयस्वाल या बंधूंच्या जोडी विरोधात छत्रपती संभाजी नगर येथील दशमेश नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख परवेज अहमद, शेख फुलेज अहमद व इतरांची छत्रपती संभाजीनगर हद्दीमध्ये नगर भूमापन क्रमांक 17 850/2 ही मिळकत आहे .ही मिळकत अभिषेक जगदीश जयस्वाल राहणार दशमेश नगरी आणि अमरीश जगदीश जयस्वाल राहणार नूतन कॉलनी या दोघांनी दिनांक 31 डिसेंबर 2018 रोजी खरेदी खत क्रमांक 12 777 / 2018 अन्वये दि मलकापूर कॉपरेटिव बँक मर्यादित शाखा छत्रपती संभाजी नगर येथे गहाण ठेवून या जागेवर नऊ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पुढे हे कर्ज थकले त्यामुळे बँकेचे वसुली अधिकारी राजेंद्र जाधव दि मलकापूर अर्बन कॉपरेटिव बँक मलकापूर यांनी या प्लॉटवर जप्तीची नोटीस लावली मूळ मालक आणि तक्रारदार यांना नोटीस लावली, ही नोटीस पहाताच तक्रारदार शेख परवेज शेख अहमद, शेख फुलेज शेख अहमद यांनी त्यांच्या वकिलांमार्फत बँकेला कळविले की ही मिळकत आमची असून आम्ही कोणालाही ती हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे बँकेने दिलेली कारवाईची नोटीस रद्द करावी. या नोटीसच्या अनुषंगाने बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक क्रमांक दोन छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे चौकशी केली असता जयस्वाल बंधूंनी दिलेल्या नंबरची दस्त नोंदणी बनावट आहे. या अनुषंगाने जयस्वाल बंधूंनी समर्थ नगर येथील नगर भूमापन क्रमांक 17850/2 या भूखंडाचा बनावट दस्तावेज तयार करून बँकेला सादर केला आणि त्या आधारे 9 कोटी रुपयांचे मुदत कर्ज घेतले . ते परत फेडही केले नाही. त्यामुळे बँकेची फसवणूक झाली . ही फसवणूक निष्पन्न झाल्यानंतर बँकेचे अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अभिषेक जयस्वाल, अमरीश जयस्वाल यांच्या विरोधात वेदांत पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, अन्वये फसवणुकीचा गुन्हा आज दिनांक 25 रोजी दाखल करण्यात आला आहे .दरम्यान दोन्ही बंधूंना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दिनांक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन सय्यद हे करीत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172