न्याय द्या !न्याय द्या! वेगवेगळ्या खूनातील पीडितांचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर टाहो
जालना- जालना जिल्ह्यात मागील महिनाभरामध्ये दोन खून झाले आणि हे दोन्हीही खून तरुणांचे झाले आहेत. त्यामुळे समाज चांगला ढवळून निघाला आहे आणि म्हणूनच खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी करणारी निवेदने आज जिल्हाधिकाऱ्यांना दोन्ही पीडितांच्या वतीने देण्यात आले आहेत.
जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागामध्ये दिनांक 26 मे रोजी रात्रीच्या सुमारास व्यंकटेश तुकाराम गायकवाड या कैकाडी समाजातील तरुणाच्या खून करण्यात आला होता. यासंदर्भात आरोपींवर कडक कारवाई करावी करावी आणि जे आरोपी आजारपणाच्या नावाखाली रुग्णालयात आहेत त्यांनाही अटक करावी अशी मागणी या समाजाने यापूर्वीच केलेली आहे. तसेच दिनांक 10 जून रोजी कैकाडी समाजाच्या वतीने मोर्चाही काढण्यात येणार होता,परंतु जमावबंदीचे कारण पुढे सरकवून प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली. आता या आरोपींवर त्वरित कारवाई करावी आणि हा खटला जलद गती न्यायालयाकडे वर्ग करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आज या समाजाचे प्रतिनिधी राजेंद्र जाधव, अशोक पवार, बाबुराव जाधव, रमेश गायकवाड ,बाबुराव पवार, रामलाल जाधव, हरिश्चंद्र जाधव, शेषराव जाधव, आदींची उपस्थिती होती.
दुसऱ्या प्रकरणात जालना तालुक्यातील नेर येथील तरुण संतोष किसनराव उफाड या तरुणाचा गावातीलच उफाड परिवारातील सदस्यांनी संगणमत करून शेतीच्या वादातून खून केला आहे आणि यामध्ये आठ आरोपी आहेत. या आठही आरोपींना जामीन देऊ नये आणि जामीन मिळाला तर गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच एकाआरोपीला जरी जामीन मिळाला आणि गावात पुन्हा कांही प्रश्न उद्भवले तर याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील असेही नमूद केले आहे. हे निवेदन देण्यासाठी नेर येथील सुमारे शंभर ते दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामध्ये ज्ञानेश्वर उफाड, नंदकिशोर, उफाड, विजय उपाड, पांडुरंग उफाड ,रंगनाथ कुंडलिक उफाड, संतोष आसाराम सहाने, शहबाज खान ,रामेश्वर सहाने, अंबादास कुरेवाड आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172