ध्येयाची ज्योत मालवू देऊ नका, भडका उडेपर्यंत तेवत ठेवा- उद्योजक डी.बी. सोनी
जालना -एखाद्या ध्येयाची मनामध्ये जर ज्योत पेटवली असेल तर ती कधीही मालवू देऊ नका ,ती सतत तेवत ठेवण्यासाठी त्यामध्ये तेल घालत राहा ,जेणेकरून एक ना एक दिवस या ज्योतीचा भडका उडेल आणि आपले ध्येय साध्य होईल .असे विचार लोखंडी सळ्या उत्पादन करणाऱ्या मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड चे कार्यकारी संचालक द्वारकाप्रसाद (D. B.)सोनी यांनी व्यक्त केले.
बियाणे उद्योजक पद्मभूषण स्व. बद्रीनारायण बारवाले यांचा जन्मदिन उद्योजक दिन(Entrepreneurs day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्य आज जेईएस महाविद्यालयांमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. सोनी यांनी बीज भाषणातून आपले विचार मांडले. यावेळी नवतरुण उद्योजक जिजाई ट्रेलर्सचे संस्थापक कार्यकारी संचालक अक्षय चव्हाण यांनी ट्रॅक्टर सोबत लागणाऱ्या ट्रेलरची निर्मिती केली आहे आणि या निर्मिती संदर्भात माहिती दिली. या ट्रेलरचा आधुनिक काळामध्ये वेळ, पैसा, आणि मनुष्यबळ याचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याविषयी सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी जे .इ. एस. शिक्षण संस्थेचे सचिव पुरुषोत्तम बगडिया, विनोदराय इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड चे कार्यकारी संचालक सुनील रायठ्ठा, रितेश मिश्रा, जे. इ. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा राठी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरुणा मारोळकर यांनी मानले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172