जालना- शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी ते नोकरदार,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील शेकडो शिष्य आपल्या गुरुबद्दलची कृतीशील कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.
समाजजीवनातील विविध क्षेत्रात कमालीचा नकारात्मक सूर उमटताना दिसून येतो. आपण नेहमीच म्हणतो,की समाजात आदर्श फारसे दिसत नाहीत. एखाद्या व्यक्तीसमोर नतमस्तक व्हावे,असे व्यक्तीत्वही आज फारसे आढळून येत नाहीत. बदलती जीवनशैली,समाज माध्यमांचा जोमाने वाढणारा प्रभाव,तंत्रज्ञानाची जलद गती यामुळेच माणूस मूल्यसंस्कार, जीवनमूल्य विसरत चालला, की काय असे वाटत असताना जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील हभप साळूबा महाराज सोनुने यांचे वारकरी सेवा धर्माचे कार्य समाजाला दिशा देणारे असेच म्हणावे लागेल. प्रापंचिक लोकांना परमार्थ व वारकरी संप्रदायाच्या जीवनमूल्यांची रुजवण करण्याचे कार्य ‘ वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘ करण्यात येते.
• जाफराबाद तालुक्यातील ३२ गावातील शेकडो महिला पुरुषांना एकत्रित करीत चतुर्थीच्या दिवशी एक दिवसीय संकीर्तन सोहळा आयोजित केला जातो.
वारकरी संप्रदायाचा जीवनमूल्य विचार प्रचार आणि प्रसार करताना अध्यात्मिक जनजागृती,जीवनमूल्ये, व्यसनाधिनता दूर व्हावी यासाठी निर्व्यसनी समाज निर्मिती. सतत बारा वर्षांपासून ३२ गावातील लोक यात सहभागी होतात. सर्वानी ठराविक वेळेत एकत्र जमायचे पहिल्यांदा ग्रामसफाई करायची, ग्राम प्रदक्षिणा मारली जाते.हरिपाठ, प्रवचन,भजन आणि सामुहिक भोजन असे उपक्रम चालतात. संत साहित्याचा, विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, समाज व्यसनापासून दूर जावा,यासाठी हभप सोनुने महाराज यांचे विशेष प्रयत्न चालतात.कुंभारझरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला १२ वर्ष पूर्ण झाले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून कुंभारझरी ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी काढण्यात येते. श्रीक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यास ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला १२ वर्ष होत आहे.
जालना- हभप सोनुने महाराज यांचे शिष्य अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त पाच दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यातील विशेष बाब अशी,की ३२ गावातील मुख्य आयोजन करणारे ३ हजार लोक आहेत. आम्हाला आमच्या गुरुने जीवनाचा मार्ग दाखविला असून वारकरी संप्रदायाचे आम्ही पूजक आहोत,या हेतूने आम्ही आमच्या सोनुने गुरुजींसाठी हे करीत असल्याची प्रांजळ भावना अनेकजण व्यक्त करतात.
•वारकरी,टाळकरी,विणेकरी,मृदंगाचार्य, प्रवचनकार, प्रबोधनकार हे पाच दिवस अखंड हरिनाम सप्ताहात सेवा देणार आहेत.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172