जालना- शहरातील व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वीची मर्चंट कॉपरेटिव्ह बँक आणि आजची मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व बँकेने सहा लाखांचा दंड ठोकला आहे. 31 मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणामध्ये रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना काही अनियमितता आढळली आणि त्यासंदर्भात रिझर्व बँकेने कर्ज वाटप करताना निकषाची पायमल्ली केली असा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीस चे योग्य उत्तर न मिळाल्यामुळे रिझर्व बँकेने सहा लाखांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे या बँकेचे अध्यक्ष हे एक सीए असताना बँकेत होणारी अनियमितता आणि दंड या दोन्ही गोष्टी खातेदारांना विचार करायला लावणाऱ्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील एकूण तीन बँकांना अशा प्रकारचा दंड ठोठावण्यात आला आहे .त्यामध्ये सर्वात जास्त दंड हा जालना येथील मर्चंट को-ऑपरेटिव बँकेला ठोकण्यात आला .त्या पाठोपाठ दोन लाखांचा दंड हा शहादा येथील द शहादा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला आणि वीस हजारांचा दंड हा सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांना ठोठावण्यात आला आहे. दरम्यान जालना येथील ज्या संचालकाच्या प्रकरणामुळे हा दंड भरावा लागणार आहे त्या संचालकाचा राजीनामाही घेण्यात आला आहे परंतु रिझर्व बँकेने तो विचारात घेतला नाही.
काय आहे प्रकरण?
व्यवसायाने सीए असलेले गोपाल अग्रवाल हे या बँकेचे अध्यक्ष आहेत .एकूण 16 संचालकांची ही बँक आहे याच संचालकांपैकी असलेले मनोहर शिनगारे यांच्या काही समूहांना बँकेने 9 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, त्यापैकी चार कोटी रुपयांचे कर्ज वसुली झाले आहे उर्वरित पाच कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली सुरू आहे. दरम्यानच्या काळात आर्थिक वर्ष संपल्यामुळे रिझर्व बँकेच्या वतीने या बँकेचे अंकेक्षण म्हणजेच ऑडिटही करण्यात आले. या ऑडिटमध्ये हे कर्ज लेखापरीक्षकांनी मर्चंट बँकेने अतिरिक्त तारण ठेवून न घेता दिले आहे. जे की ते नियमाच्या बाहेर आहे . यासंदर्भात खुलासा करण्यासाठी रिझर्व बँकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आणि त्याची सुनावणी ही झाली. मर्चंट बँकेने सुनावणी पूर्वीच या बँकेचे संचालक मनोहर शिनगारे यांचा मे महिन्यातच राजीनामा घेतला होता. त्यामुळे युक्तिवादात बँकेने संचालकाचा राजीनामा घेतला आहे असे सांगितले परंतु रिझर्व बँकेने ज्यावेळी हे प्रकरण झाले त्यावेळी ते संचालक होते ,त्यामुळे ही सर्व बँकेची अनियमितता आहे असे ग्राह्य धरून बँकेला सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सर्व प्रकरणाला मोतीराम अग्रवाल मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांनी दुजोरा दिलेला आहे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२