अंबड- जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या अंबड येथे एक पुरातन मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबाचं मंदिर आहे. मंदिर किती वर्षांपूर्वीच आहे याचा कुठेही लेखाजोखा नाही परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे .मागील सात पिढ्यांपासून या मंदिराचे विश्वस्त आणि वंशपरंपरागत पुरोहित म्हणून सबनीस परिवाराकडे जबाबदारी आहे .अहिल्यादेवींनी जरी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असला तरी सध्या परिस्थितीमध्ये पुन्हा या मंदिराची देखभाल दुरुस्तीची गरज आहे. हे मंदिर पुरातन असल्यामुळे याची दुरुस्ती देखील त्याच पद्धतीने आणि गुणवत्तेने व्हायला पाहिजे म्हणून या मंदिराचे विश्वस्त खंडेराव सबनीस यांनी पुरातत्व विभागाकडे मंदिराची पाहणी आणि देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी केली होती .त्याला प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने देखील दोन कोटी रुपये खर्चाला मंजुरी देऊन येथील देखभाल दुरुस्ती सुरू केली आहे. पुढील वर्षभरामध्ये ती पूर्ण देखील होईल .दरम्यानच्या काळात मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी सुरू केलेल्या उत्खननामध्ये दोन भूमिगत रांजण म्हणजेच हौद सापडले आहेत. यापूर्वी मंदिरातच दोन मोठे मोठे रांजण आहेत. त्याचा आजही वापर केला जातो. अन्य दोन रांजण हे याच परिसरात असलेल्या विश्वस्तांच्या निवासस्थानात आहेत म्हणजेच एकूण सहा रांजण हे त्या काळचे आजही इथे सुस्थितीत आहेत आणि त्यांचा वापर होत आहे. अशाच प्रकारचे रांजण पैठण येथील नाथ महाराजांच्या मंदिरात देखील पहायला मिळतात.

जसे हे रांजण वैशिष्ट्यपूर्ण आहेत तसेच इथे अनेक इतरही वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये पंचमुखी गणपती, दोन पिंडीचा महादेव, सजीवांच्या आयुष्याचा लेखाजोखा लिहिणारे चित्रगुप्त, महालक्ष्मी सोबत विष्णू आणि आपत्कालीन मृत्यू टाळण्यासाठी बिलवेश्वर महादेव. अशा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेलं हे खंडोबाचे मंदिर या मंदिराविषयी आणखी माहिती देत आहेत मंदिराचे अध्यक्ष खंडेराव सबनीस.

ब्रॉडकास्ट लिस्ट आणि व्हाट्सअप ग्रुप ची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लिंक येईलच याची खात्री नाही. कृपया वाचकांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप चैनल च्या लिंक ला ॲड व्हावे ही विनंती.
Edtv News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
Follow You tube https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
Web-www.Edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172
