Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Roobet alternatives for US players security guide

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!
    Breaking News

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    EdTvBy EdTv02/10/2026No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने वृद्ध महिलेला लुटले आणि तिच्या अंगावरील साडेचार लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

    शहरातील काद्राबाद भागात राहणाऱ्या श्रीमती पद्माबाई इंदरचंद कोठारी व 73 वर्ष या काल दिनांक १ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणेश भवन येथे दर्शन घेऊन घरी परतत होत्या. दरम्यानच्या काळात त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर पाठीमागून एक भमटा आला. आणि त्याने आपण पोलीस आहोत असे सांगितले. कालच एका कुलकर्णी मॅडमला इथे लुटले आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असा सल्ला दिला. परंतु हा सल्ला श्रीमती कोठारी यांनी ऐकला नाही .आपले घर जवळच आहे असे त्यांनी त्या भामट्याला सांगितले. त्यामुळे भामट्याने दुसरा डाव टाकला आणि त्याचा एक सहकारी पाठीमागून तिथे आला आणि त्या सहकाऱ्याला  उद्देशून त्याने त्याच्या अंगावरील चैन आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार या भामट्याच्या सहकाऱ्याने महिलेसमोरच अंगठी आणि सोन्याचे दागिने त्याच्या बॅगमध्ये काढून ठेवले. आणि त्यानंतर पुन्हा या भामट्याने सांगितले की पहा त्याने काढून ठेवले तुम्ही पण काढून ठेवा. श्रीमती कोठारी या दागिने काढून ठेवत असतानाच भामट्याने पुन्हा तिसरा डाव टाकला आणि मी तुम्हाला पर्समध्ये हे दागिने ठेवून देतो असे सांगितले. हे दागिने ठेवल्याचा बनाव करून पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरील सहकाऱ्यासोबत तो निघून गेला. 

    आपल्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे याची शंका श्रीमती कोठारी यांना आल्यामुळे त्यांनी लगेच पर्स मधील दागिने पाहिले परंतु ते गायब झालेले होते. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत हे भामटे दिसेनासे झाले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भरत ज्वेलर्स मधील आपल्या मुलाला ही हकीकत सांगितली. परंतु काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आज पद्माबाई इंदरचंद कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाच तोळ्याच्या पाटल्या आणि गळ्यातील चैन असा एकूण चार लाख 44 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिनावर या भामट्या पोलिसांनी डल्ला मारला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी या भामट्याच्या शोधात निघाले आहेत.

    -दिलीप पोहनेरकर,edtvjalna 9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #भामटा #फसवणूक#लूट#दागिने#पद्माबाई कोठारी#jalna news# sp jalna#दागिने#crime news #पोलीस भामटे
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    02/10/2026

    Roobet alternatives for US players security guide

    01/10/2026

    Casinos like BC Game in the United States

    01/10/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,122 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,141 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,224 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,156 Views
    Don't Miss
    Breaking News 02/10/2026

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    जालना-पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने वृद्ध महिलेला लुटले आणि तिच्या अंगावरील साडेचार लाख रुपयांचे…

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Roobet alternatives for US players security guide

    Casinos like BC Game in the United States

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Roobet alternatives for US players security guide

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views

    लोधी मोहल्ला दगडफेक प्रकरण; 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    11/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.