शिव-शक्ती च्या दर्शनासाठी भक्त व्याकुळ; मात्र प्रवेश द्वार बंद; पुजारीही त्रस्तshradhasthan
जालना- सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीच जालना राजुर रस्त्यावर जालन्या पासून दोन किलोमीटर अंतरावर ढवळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तीस वर्षांपूर्वी या मंदिर परिसरात निवासी वस्ती होण्यास सुरुवात झाली आणि हळूहळू हा परिसर जनतेच्या गर्दीने फुलून गेला.
या गर्दी सोबतच मंदिराचे महत्त्वही वाढायला लागले आणि हळूहळू ढवळेश्वर महादेव मंदिर म्हणजे जालनेकरांचे श्रद्धास्थान झाले. खरंतर हे महादेवाचं म्हणजे शिवाचे ठिकाण, मात्र जिथे शिव आहे तिथे शक्ती पाहिजे म्हणून सोनई येथील हरिहरानंद महाराज अर्थात जे सोनई चे अण्णा महाराज म्हणून सर्वदूर परिचित होते त्यांनी या शिवा सोबत शक्तीही पाहिजे म्हणून 1984 मध्ये रेणुका मातेची प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे एकाच परिसरात आता शिव-शक्तिचा संगम आहे. भाविकांना देखील एकाच ठिकाणी या दोन्ही शक्तींचे दर्शनही घडते.
मंदिर तसं सर्वसामान्य मंदिराप्रमाणेच पुरातन आणि हेमाडपंथी होतं. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन परत फिरणे अवघड जात होते. त्यामुळे परिसरातील भाविकांनी या मंदिराचा 2014मध्ये जीर्णोद्धार केला आणि दगडांच्या शिळामध्ये सुंदर कलाकृतीचं आकर्षक भव्य दिव्य मंदिर बांधले .या शिवालयाच्या समोर डोंगरे महाराजांनी हनुमानाची स्थापना केलेले आहे, तर बाजूलाच अण्णा महाराजांनी आदिशक्ती रेणुका मातेची ही स्थापना केलेली आहे.
या तीनही शक्तीचा संगम इथे पहावयास मिळतो. मंदिराच्या समोर भव्य प्रांगणात असल्यामुळे बालगोपाळांची किलबिल इथे कायम चालु असते. आणि यातूनच संस्काराची जडणघडण देखील त्यांच्यावर होते .हे सर्व होत असतानाच गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या आपत्तीमुळे मंदिर बंद आहेत आणि यामधून या शिवशक्तीची देखील सुटका झालेली नाही. केवळ सायंकाळच्या वेळी मुलांच्या किलबिलाटाशिवाय इथे कोणताही मंत्राचा जयघोष ऐकायला मिळत नाही.
मंदिराच्या बाहेर पान -फुल प्रसाद,विक्रेते दिसत नाहीत. मंदिराचे विश्वस्त आणि परंपरागत पुजारी पुरुषोत्तम मुळे यांचे वारसदार वैभव मुळे यांच्याकडे सध्या या मंदिराची जबाबदारी आहे. वैभव मुळे यांच्या मातोश्री वसुंधरा मुळे आणि त्यांच्या दोन्ही भगिनी या मंदिराचे व्यवस्थापन पाहतात
मंदिराला कायमस्वरूपी काहीच उत्पन्न नाही. मात्र दरवर्षीच्या श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीला येणाऱ्या उत्पन्नातून वर्षभराची देखभाल-दुरुस्ती केली जाते. त्याच सोबत या मंदिराचा महत्त्वाचा भाग असलेला मारवाडी समाज गुरुपौर्णिमा ते राखी पौर्णिमेपर्यंत आवर्जून इथे येतात आणि ढवळेश्वरची यथासांग पूजा करतात. यामधून देखील मंदिराला उत्पन्न होते, तसेच सर्वत्र एक महिना सुरू असलेला श्रावण महिना इथे मात्र तो दीड महिन्यापर्यंत सुरू राहतो .गुरुपौर्णिमा ते पोळा या दीड महिन्यादरम्यान येथे भाविकांची मोठी गर्दी असते. हीच गर्दी वर्षभराचे उत्पन्न मिळवून देते. मात्र गेल्या अठरा महिन्यांमध्ये हे सर्वच बंद आहे त्यामुळे मुळे परिवार देखील अडचणीत सापडला आहे? मंदिराच्या बाजूला पुरातन बारव आहे आजही या बारवा मध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत मात्र त्या उपयोगात नसल्यामुळे गाजर गवताने त्यावर ताबा मिळविला आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172