आघाडीच्या बंदला जालन्यात अल्प प्रतिसाद
जालना- उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या चिरंजीवांनी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या आंदोलकांच्या अंगावर वाहनही घातले, यामध्ये सात शेतकरी आणि एका पत्रकाराचा जीव गेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील तीनही पक्षांच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. जालना शहरांमध्ये या बंदला अल्पसा प्रतिसाद मिळाला.
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, युवा सेनेचे नेते अभिमन्यू खोतकर, माजी आमदार अरविंदराव चव्हाण शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सविता किवनडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या मनकर्णिका डांगे यांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या आवाहनाला व्यापार्यांनी अल्पसा प्रतिसाद दिल , हे नेते पुढे गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे दिसले.
-दिलीप पोहनेरकर, edtv news, 9422219172