Advertisment
Jalna District

लाईटचे काम करणारा कामगारच  निघाला आरोपी; दिला दहा लाखांना झटका; तीन आरोपी गजाआड

जालना- बडी सडक वर राहणाऱ्या सुनील लाहोटी यांच्या भर वस्तीतील घरी काल रात्री  बारा ते दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आणि सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला होता. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे परिसरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये घबराट निर्माण झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा तातडीने कामाला लागली आणि आज चोवीस तासांमध्ये त्यांनी या गुन्ह्यातील आरोपी सह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई करत असताना त्यांच्या हाती आणखी एक गुन्हा लागला आहे आणि तो म्हणजे आरोपीकडे एक गावठी पिस्तूल देखील सापडले आहे. या पिस्टल प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल झालेल्या चोरीचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना माहिती मिळाली की केटरिंग आणि मंडप डेकोरेशन चा व्यवसाय करणाऱ्या सुनील लाहोटी यांच्याकडे गोपाळपुरा भागात राहणारा विजय सत्येन्द्रकुमार गुप्ता हा लाईटचे काम करत होता, आणि त्याला घराची सर्व माहिती देखील होती. त्याअनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे विजय कुमार गुप्ता याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने आनंदसिंग मोहनसिंग ठाकूर, राहणार जेईएस कॉलेज जवळ जालना, सोनू लाखनसिंग जाटव, राहणार महाराजा दरवाजाच्या जवळ विटा, तालुका जिल्हा विटा (उत्तर प्रदेश) या तिघांनी मिळून केल्याची कबुली दिली. चोरून नेलेल्या ऐवजा पैकी 41 हजार 920 रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यांमध्ये वापरलेली स्कुटी असा एकूण पाच लाख 57 हजार 72 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.  त्याच सोबत या प्रकरणाचा तपास करत असताना विजय कुमार गुप्ता यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल सापडले. त्यासोबत दोन मॅगझीन व वेगवेगळ्या आकाराचे  एकवीस जिवंत काडतुसे असा एकूण 27 हजार 200 रुपयांचा मुद्दे मालही सापडला. या पिस्टल प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरीला गेलेल्या दहा लाखांचा मुद्देमाला पैकी अजून अर्धा मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे. हा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, श्यामुएल कांबळे ,गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, सचिन चौधरी, कैलास चेके, महिला पोलीस कर्मचारी चंद्रकला शडमल्लू आदींनी काम पाहिले.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button