पाच महिन्याचे वेतन रखडले ;जिप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण
जालना- जिल्हा परिषद अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी हातपंप, वीजपंप, मदतनीस ,यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, वाहन चालक, अशा 36 कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 5 महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण पडला आहे. यासंदर्भात त्यांनी वारंवार जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना निवेदन देऊनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आज दिनांक 14 पासून हे सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
हे विविध वर्गवारीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यामध्ये त्यांना सहा हजार रुपयांपासून ते बत्तीस हजार रुपया पर्यंत मासिक सेवानिवृत्ती वेतन मिळते. या 36 कर्मचाऱ्यांसाठी सुमारे पंधरा लाखांचा निधीची जिल्हा परिषदेला तरतूद करावी लागते .मात्र पाच महिन्यांपासून या पैशाची तरतूदच नसल्यामुळे हे निवृत्ती वेतन रखडले आहे .आज उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फकीरा वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष एम. एम. देशमुख, कोषाध्यक्ष जी. एम. कांबळे, एस.टी. कार्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप देशपांडे ,एस.पी. पोतदार. नेमाने यांच्यासह अन्यकर्मचारी बसले आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna