Advertisment
Jalna Districtबाल विश्व

आज मराठी भाषा गौरव दिन: संत- पंत- आणि तंत या शब्दांनी नटलेली भाषा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  शुभेच्छा!

संत- पंत -आणि तंत शब्दाने नटलेली मराठी भाषा. आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती अर्थातच  मराठी भाषा गौरव दिन. वर्षभर आपल्या कानावर एक शब्द पडतो आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, परंतु नेमकं अभिजात दर्जा म्हणजे काय? आणि तो मिळाल्यानंतर काय फायदा होईल? याविषयी फार त्रोटक माहिती मिळते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे यांच्यासोबत या गौरव दिनाच्या निमित्ताने संवाद साधला आहे  त्यांचेच विद्यार्थी प्रा. डॉ. सुहास सदाव्रते यांनी. यावेळी बोलताना  प्रा.कोरे यांनी असे सांगितले ,”जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर केंद्र सरकारचं या भाषेच्या विकासासाठी, संवर्धनासाठी, जतनासाठी, 500 कोटींचे पॅकेज मिळूशकतं, आणि ते मिळाल्यानंतर राज्यामध्ये नाट्य, साहित्य, साहित्य संमेलन ,आणि एकंदरीत मराठी भाषेला प्राधान्य देऊन तिच्या विकासाला प्राधान्य देऊन ती अजरामर करता येईल.  हा दर्जा मिळण्यासाठी सातत्य, श्रेष्ठत्व, स्वयंभू आणि प्राचीन या चार गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या मराठी भाषेला मिळालेल्या आहेत .त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा हा मिळायलाच हवा! असा आग्रह देखील  प्रा.कोरे यांनी केला आहे.

दरम्यान मराठीचा प्रवास हा संत- पंत- आणि तंत या शब्दांवर आधारित आहे. आणि 16 संस्कार या भाषेवर झालेले आहेत. त्यामुळे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
९४२२२१९१७२

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button