बौद्ध धर्म हा आचरणाचा धर्म- भदंत श्रवण अशोक
जालना-बौद्ध धर्म हा वाचण्याचा किंवा समजण्याचा धर्म नाही तर तो आचरणाचा धर्म आहे. जोपर्यंत आपण या धर्माचे आचरण करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला हा धर्म कळणार नाही. या धर्माचे आचरण म्हणजेच बौद्ध धर्म आहे आणि हा धर्मच प्रत्येकाला चांगली शिकवण देऊ शकतो. असे मत भदंत श्रवण अशोक यांनी व्यक्त केले. दरम्यान या धर्मामध्ये एकतेची कमी आहे आणि याचे कारणही आपणच आहोत. परंतु आता ही दरी कमी करून सर्वांना एकत्र आणायचे आहे त्यामुळेच ही यात्रा सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.थायलंड येथील भदन्त श्रवण अशोक (हिंदी चित्रपट अभिनेते )यांनी आज जालना येथे बोलत होते.
संबोधी अकादमी महाराष्ट्रच्या वतीने संपूर्ण भारतात धम्मयात्रा आयोजित करण्यात आली आहे. बुद्धगया
ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू (मध्यप्रदेश) आणि महाराष्ट्रात चैत्यभूमी ते दिक्षाभूमी धम्मयात्रेतील थायलंड येथील भिक्खु संघाचे आज जालना येथे आगमन झाले होते. याप्रसंगी जालना शहरातील बौद्ध उपासकांच्या वतीने भिक्खु संघाचे शासकीय विश्रामगृहात
स्वागत करण्यात आले. यावेळी धम्मदेसना देतांना भदन्त श्रवण अशोक बोलत होते.
यावेळी थायलंड येथील भदन्त प्रमहा बोधिनहमुनी, भदन्त वेण फ्रक्रूशीला खुणसमोतरं, भदन्त वेण फ्रविणयसुती, भंते अणेक, भंते वेण रत्नेश्वर चकमा , भंते फ्रामहा बनजोंग अर्थिजवानसो, भंते फ्रामाहा सिरिचाई यानानवत्तानो, यांच्यासह कॅप्टन नत्ताकिट (थायलंड) यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पुज्य भदन्त श्रवण अशोक म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते संपूर्ण भारत बौद्धमय करेल. भारत बौद्धमय करण्याची वेळ आलीय. जे धम्मचक्र त्यांनी चालविले होते त्याची गती मंद झालीय. ही गती वाढविण्यासाठी आम्ही एक धम्मयात्रा काढलीय. आपल्यासोबत थायलंड येथील बौद्ध भिक्खु आहेत. आम्ही संपूर्ण भारतात तथागत गौतम बुद्धांच्या ८४ हजार मूर्त्यांचे वाटप करणार आहोत. या मुर्त्या वाटप केल्यानंतर घरा घरात बौद्ध धम्म पोहोचेल. हा असा धम्म धर्मांतर करून किंवा भांडण तंटे करीत नाही, तर सर्वाना जोडण्याचे काम करतो. तुम्ही तुमच्या जीवनात धम्माचे आचरण केल्यास तुम्ही निश्चित चांगले व्यक्ती व्हाल. आपल्या येथील बौद्ध समाजात एकतेची कमतरता आहे, जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला मागे खेचण्याचे काम होते.
याप्रसंगी बौद्ध उपासक प्रकाश गडवे, अंकुश नाकलगावकर, डी. आर. हिवराळे, गौतम वावळे, दिनकर घेवंदे, सुबोधकुमार जाधव, नागसेन बनकर, बबन पव्हरे, हिमतराव म्हस्के, भारत खंडारे, प्रभाकर घेवंदे, रमेश पाडमुख, राजेश सदावर्ते, संजय हेरकर, हरीष रत्नपारखे, चंद्रमणी गाडेकर, केशव पगारे, संजय कसबे, मीनाताई प्रकाश गडवे, ज्योती गौतम वावळे, अश्विनी संजय कसबे यांच्यासह बहुसंख्येने बौद्ध उपासक उपसिकांची उपस्थिती होती.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com