जालना
पी. आर. कार्ड (मालमत्ता प्रमाणपत्र) वरील नाव दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणारा लाचखोर पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.जालनातील इन्कम टॅक्स कॉलनी भागात राहणारे माधव पांडुरंग ओगले,54वर्षे असे या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
एका सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याने जालना शहरात एक भूखंड खरेदी केला होता, आणि तो खरेदी करताना मालमत्ता प्रमाणपत्रावर चुकीच्या नावाची नोंद घेतल्या गेली. ती दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने दिनांक 18 डिसेंबर 2020 ला भुमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता, आणी त्यावेळेस पासून संबंधित तक्रारदार वारंवार या कार्यालयात चकरा मारून नाव दुरुस्ती करण्याची मागणी करत होता. परंतु ती दुरुस्ती होत नसल्याने शेवटी या कार्यालयातील पर्यवेक्षक माधव उगले यांच्याशी संपर्क केला, आणि त्यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. तसेच प्लॉट मोजून देण्यासाठी देखील सहा हजार रुपये मागितले परंतु प्लॉट मोजणे सध्या कोरोनामुळे शक्य नसल्याचेही सांगितले, मात्र जर सहा हजार रुपये दिले तर लगेच दुसऱ्या दिवशी खाजगीरित्या येऊन प्लॉट मोजून देतो असेही सांगितले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने दिनांक 3 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार नोंदविली. पंचासमक्ष या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळले आणि आज दिनांक चार रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय, जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माधव उगले यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई या विभागाचे उपाधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एस. ताटे पोलीस कर्मचारी ज्ञानदेव जुंबड, गजानन कांबळे, आरेफ शेख, आदींनी केली.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पीआर कार्ड वरील नाव दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच; पर्यवेक्षक जाळ्यात
Next Article तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू