Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

वेगवेगळे अवतार आणि लाकडी साहित्यांचा बाजार आनंदी स्वामी यात्रेचे वेगळेपण

जालना- प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे महत्त्व असतं आणि त्यामुळेच सामान्य माणूस त्या वैशिष्ट्याकडे आकर्षिला जातो. असेच काही वेग-वेगळे वैशिष्ट्य आहेत प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यातील श्री. आनंदी स्वामी महाराज यांची.

 

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आनंदी स्वामी महाराजचं मंदिर जालन्यात स्थापित झालं आणि हळूहळू भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं हे दैवत म्हणून नावलौकिकाला आले. चार मजली लाकडी गाभारा आजही सुस्थितीत इथे पाहायला मिळतो. त्यासोबत या यात्रेचे दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगता येतील त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य म्हणजे श्री आनंदी स्वामी महाराज यांचे सातही दिवस वेगवेगळे अवतार भक्तांना पाहायला मिळतात. वारानुसार हे वेगवेगळे अवतार आहेत. त्यामध्ये दत्तावतार, मल्हारी मार्तंड ,शिवपार्वती, राम सीता, वेंकटेश, शेषशाही भगवान हे अवतार पाहण्यासाठी भक्तही गर्दी करतात.

दुसरं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आनंदी स्वामी महाराज यांच्या नावानेच ही गल्ली देखील प्रसिद्ध आहे. अगदी छोट्याशा गल्लीमध्ये लाखोंची उलाढाल होते ती लाकडी साहित्याच्या माध्यमातून. जालना शहरात बरवार म्हणजेच लाकडी काम करणारा समाज मोठा आहे, आणि त्यांची उपजीविका याच व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभर हा समाज वाट पाहतो ती आनंदी स्वामींच्या यात्रेची! कारण देवपाटापासून ते पांगुळगाडा, पोळपाट, लोटाळने, स्टूल, टेबल, आणि सर्वच प्रकारच्या लाकडाच्या साहित्यांची येथे उलाढाल होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही यात्राच भरली नव्हती आणि याचा परिणाम या समाजाच्या उपजीविकेवरही झाला होता. यावर्षीही यात्रा भरल्यामुळे हा समाज आनंदी झाला झाला आहे.

आषाढी एकादशीला पहाटेच श्री आनंदी स्वामी महाराजांची पालखीतून स्वारी निघते ती नगर प्रदक्षिणेला. कचेरी रोड, गणपती गल्ली, कसबा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, असा मार्गक्रमण करते. ही पालखी मार्ग मार्गक्रमण करीत असताना भाविकांनी घरासमोर काढलेल्या रांगोळ्या आणि घरांच्या वरून पालखीवर होणारी पुष्पवृष्टी हा नयनरम्य सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटते .याच दरम्यान नगर भवन जवळ मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पालखीतील भाविकांचेही स्वागत केल्या जाते.

रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये आणि “भजगोविंदम भज गोपाल, आनंदी स्वामी दिनदयाल” असा आनंदी स्वामींचा जयघोष करत पावसाच्या आणि पालखीच्या आनंदात भाविक चिंब भिजून जातात.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button