आम्हाला आमचा राम द्या! सोन्याचा नको
घनसावंगी- गेल्या आठ दिवसांपूर्वी जांब समर्थ येथून श्रीराम मंदिरातून राम पंचायतनची चोरी झाली होती. 700 वर्षांपूर्वीच्या या मूर्ती होत्या आणि या मूर्तींची स्वतः समर्थ रामदास स्वामींनी पूजा केली होती .त्यामुळे त्यांचे पावित्र्य आमच्यासाठी पर्याय ठरू शकत नाही.
म्हणून प्रशासनाने सोन्याच्या मूर्ती दिल्या तरी आम्हाला त्या नकोत, आम्हाला त्याच मूर्ती पाहिजेत ,ज्याची पूजा समर्थांनी केली आहे आणि जोपर्यंत या मूर्ती मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे म्हणत गावातील महिलांनी श्रीराम मंदिरात राम नामाचा जप सुरू केला आहे. आज मंगळवारी चूल बंद करून गावातील काही महिला राम मंदिरामध्ये बसल्या आहेत आणि हे आंदोलन हळूहळू व्यापक स्वरूप घेईल अशी माहिती देखील या महिलांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनापुढे एक मोठा पेच निर्माण होत आहे . गेल्या आठ दिवसांपासून पोलीस यंत्रणा या मूर्तींचा शोध घेत आहे मात्र अद्याप पर्यंत त्यात सापडलेल्या नाहीत.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com