Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शेतकऱ्यांना एक रुपयात फटफटी देण्यामागे देखील सरकारचे षडयंत्र- रघुनाथदादा पाटील

जालना -छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर सत्तेवर आलेले सर्वच सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहेत. या सरकारांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडून इतर विषयांवरच दिशाभूल करण्याची सवय आहे. सध्या देखील विकासाविषयी किंवा शेतकऱ्यांच्या समस्या विषयी न बोलता जनतेची दिशाभूल करून कंगना राणावत, नवनीत राणा, नेत्यांची पळवा पळवी, राष्ट्रपुरुषांचे अपमान ,अशा विषयांकडे लक्ष केंद्रित केला जात आहे. असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक सध्या जालन्यात सुरू आहे हुतात्मा बाबू गेनू व व स्वर्गीय शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी ही बैठक पार पडते. दरम्यान ईडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना रघुनाथदादा पुढे म्हणाले की ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,शेतीमालाचे भाव या विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठीच राज्यात सध्या धुमाकूळ चालू आहे. एवढेच नव्हे तर वाढत्या महागाईला देखील सरकारच कारणीभूत आहे, एकीकडे शेतकऱ्यांना एक रुपयात सातबारावर फटफटी दिली जात आहे. कारण कारखान्यामध्ये या मोटरसायकलची थप्पी लागलेली आहे आणि एक रुपयात फटफटी देताना सातबारावर त्याची नोंद केली जात आहे त्यामुळे शेतकरी आनंदाने मोटरसायकल घेऊन जात आहे परंतु या मोटरसायकल मध्ये दररोज एक रुटर पेट्रोल टाकले तर त्या रकमेपैकी 60 रुपये हे सरकारला मिळत आहेत आणि सातबारावर बोजा असल्यामुळे ही रक्कम वसूल होण्याची शंभर टक्के खात्री आहे काही दिवसातच पेट्रोल टाकून शेतकरी कंगाल होत आहे आणि कंपनी गाडीही ओढून येत आहे . हीच परिस्थिती शैक्षणिक कर्जा संदर्भात देखील आहे. बँक कर्ज देत असली तरी तो पैसा संबंधित संस्थेच्या खात्यावर जमा होतो. आणि विद्यार्थ्याला नोकरी लागल्यानंतर तो सक्तीने वसूल केला जातो त्यामुळे अशा प्रकारच्या योजना आणून सामान्य माणसांची लूट करायची आणि महागाई वाढवायची हेच सरकारचे धोरण आहे. अशा छुप्या मार्गाने शेतकऱ्यांचे खिसे कापले जात आहेत म्हणूनच हे सरकार खिसे कापू सरकार आहे असा आरोपही त्यांनी केला.

जालन्यात सुरू असलेल्या या बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्यकारणी सदस्य दत्तात्रय कदम, जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे ,सुधाकर बोबडे ,विठ्ठल ठाकूर, शिवाजी तर सूर्यभान पवार रामेश्वर गव्हाळे पांडुरंग भोसले आदींची उपस्थितीत आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button