Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

अंगारकी चतुर्थी निमित्त राजुर कडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

जालना- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र राजुर येथील राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी उसळते, ही गर्दी लक्षात घेता मंगळवार दिनांक 10 रोजी असलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ .अक्षय शिंदे यांनी या वाहतुकीच्या बदलाचे आदेश जारी केले.


दहा तारखेला अंगारकी चतुर्थी असली तरी सोमवार दुपारपासूनच राजुर कडे पायी जाणाऱ्या भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. अबालवृद्ध, तरुण-तरुणी, अशा सर्व प्रकारचे भाविक राजुरेश्वरच्या दिशेने जाण्यासाठी गर्दी करतात, त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून भाविकांची वाहने वगळता इतर अवजड वाहनांसाठी ही वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. बदल केलेल्या वाहतूक व्यवस्थेनुसार सोमवार दिनांक नऊ वाजता सकाळी दहा वाजल्यापासून ते बुधवार दिनांक 11 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हे बदल अमलात राहणार आहेत. त्यानुसार जालन्याहून भोकरदन कडे भाविकांची वाहने वगळता इतर सर्व वाहने ही भोकरदन नाका, देऊळगाव राजा, जाफराबाद, माहोरा मार्गे भोकरदन कडे जातील तसेच भोकरदन कडून येणारी वाहने भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पासून माहोरा, जाफराबाद, देऊळगाव राजा, मार्गे जालन्याकडे येतील. वाहन चालकांनी हा बदल लक्षात घेऊन आपली गैरसोय टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button