Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

GDCC प्रकरण- न्यायमूर्तींनी दीड तास युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय ठेवला राखून

जालना-ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन म्हणजे जीडीसीसी या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात आणि दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. सुमारे दीड तास चाललेला युक्तिवाद न्यायमूर्ती श्री. एस.जी.आडके यांनी ऐकून घेतला आणि अंतिम निर्णय दिनांक 28 तारखेपर्यंत राखून ठेवला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने प्रभारी जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी आणि तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी काम पाहिले ,तर आरोपींच्या वतीने विधीज्ञ भाऊसाहेब देशमुख यांनी काम पाहिले.

आरोपीच्या वतीने युक्तिवाद करीत असताना एडवोकेट देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की ,आरोपीचा या फसवणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग नाही .त्याने ते पैसे स्वतःसाठी घेतलेले नाहीत. त्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन मिळावा, तसेच आत्तापर्यंत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकूण रक्कम जेवढी समोर आली आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने पोलिसांनी मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यामुळे आरोपीचा यामध्ये सहभाग नसल्याचे लक्षात येते.

दरम्यान सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करीत असताना प्रमोटर किरण खरात याने गुंतवणूकदाराकडून रोख आणि ऑनलाईन रक्कम घेतलेली आहे. त्यामुळे ते मुख्य आरोपी आहेत आणि त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखी बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना महागड्या गाड्यांचे आम्हीच दाखविले आहे प्रत्यक्षात मात्र या सर्व गाड्या संबंधित प्रमोटर च्या नावावर आहेत आणि टोकन अमाऊंट म्हणून अडीच लाख रुपये भरलेले आहेत आणि पुढील सर्व हप्ते हे ज्याचे त्याला भरायला लावत होते तसेच ठराविक रकमेच्या अनेक पटीने रक्कम देण्याचे आमिषही ते गुंतवणूकदारांना देत होते, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये असाही युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालयाने नोंदविलेले मत. जर आरोपीचा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नाही तर सुमारे 50 लाखांची एवढी महागडी गाडी त्यांना भेट म्हणून किंवा त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून कशी मिळाली? महिनाभरातच त्यांच्या पत्नीला रेंजर गाडी कशी भेट दिली? या प्रकरणातील मुख्य तक्रारदार ऋषिकेश काळे यांनी त्यांच्या वडिलांच्या खात्यातून काढून दिलेल्या रोख साडेबारा लाख रुपयांचे पुढे काय झाले? दरम्यान आज झालेला युक्तिवादामध्ये काही नवीन नावांबद्दलही न्यायाधीशांनी सविस्तर माहिती घेतली आहे. तसेच आरोपींच्या बँक खात्यांविषयी देखील पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली आहे. एकूणच हा युक्तिवाद झाल्यानंतर 27 तारखेपर्यंत काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि 28 तारखेला अंतिम सुनावणी होईल असे आदेशित केलेआहे.

साक्षीदार आणि रक्कम वाढली .दरम्यान या प्रकरणातील साक्षीदारांमध्ये वाढ झाली आहे. आता 134 साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली आहे, आणि ही फसवणूक तीन कोटी 55 लाख 46 हजार दोनशे रुपये एवढी झाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील संशयीत आरोपींची यादीही तयार केली असून लवकरच किमान दोन आरोपी तरी पोलिसांच्या हाती लागतील अशा पद्धतीने ही यंत्रणा कामाला लागली आहे. यापूर्वी पकडलेले चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यांच्या जामीन अर्जावर अद्याप पर्यंत न्यायालयात आलेला नाही.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button