जालना- शिवजयंतीचे औचित्य साधून न्याय मंदिर परिसरात जिल्हा वकील संघाच्या वतीने विक्रांत सिंह राजपूत यांच्या पोवड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 12 रोजी करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्व न्यायमूर्तींनी फक्त हजेरीच नव्हे तर टाळ्यांनी दादही दिली.
खरंतर न्यायालय किंवा न्यायमंदिर परिसरात अनेकांची घाबरगुंडी उडते आणि त्या पदाचा सन्मान म्हणून आदराने ही पाहिला जाते. त्यामुळे नेहमीच हा परिसर सामसूम आणि शांत असतो. त्यातच न्यायमूर्तीं न्यायदानाचे कामकाज करत असल्यामुळे त्यांना समाजापासून अलिप्त राहुल काही बंधने पाळावी लागतात . त्यामुळे त्यांना विरंगुळ्याचे साधन नाही परंतु आज या पोवाड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने न्यायालयातील सर्वच न्यायाधीशांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला.या कार्यक्रमालामा प्रधान ज़िल्हा व सत्रन्यायाधीश श्रीमती मोहिते मॅडम,ज़िल्हान्यायाधीश श्रीमती देव मॅडम,ज़िल्हा न्यायाधीश श्री.टिकले साहेब ज़िल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे. यांच्यासह वकिलांमधून राम गव्हाणे,परमेश्वर घडलिंग,अश्विनी सावजी,, मनीष राऊत,अमजद अली,किशोर पुंगळे.आदींची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com