सप्तपदीचे नवव्या महिन्यात गळफासात रूपांतर :कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांरुद्ध गुन्हा दाखल
जालना- सासू कडून होणारा छळ, सवर्ण शेजाऱ्याकडून शरीर स्पर्शानंतरही त्याला पाठीशी घालणारा नवरा, चारित्र्यावर संशय घेणारी सासरची मंडळी, आणि वारंवार होणारा अपमान या सर्व त्रासाला कंटाळून सप्तपदीचे फेरे घेतलेल्या विवाहितेने अवघ्या नवव्या महिन्यातच गळफासाला जवळ केलं!. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये जालना येथील कारागृहात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिसच जर असे वागत असतील तर दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
नाशिक येथे पॉलिटेक्निक कॉलेज जवळ राहणाऱ्या अनिल साठे परिवारातील पल्लवी अनिल साठे हिचे मातंग समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे दिनांक 21 मे 2022 रोजी सामनगाव येथे त्यांच्याच नातेवाईकांपैकी असलेल्या हर्षवर्धन भाऊसाहेब खरात या तरुणासोबत झाला.तेव्हा हे नाशिकलाच राहत होते. आणि हर्षवर्धन खरात यांचे वडील भाऊसाहेब खरात हे जालना येथील कारागृहात कर्मचारी असून ते जालना येथे शासकीय निवासस्थानात राहतात. दरम्यान लग्न झाल्यानंतर काही दिवस या दोघांचा संसार बऱ्यापैकी सुरू होता. लग्नामध्ये वरासाठी संसार उपयोगी साहित्य, सोबतच एक तोळ्याची सोन्याची अंगठी ही देण्यात आली .त्यानंतर पल्लवी चे पती हर्षवर्धन आणि त्यांचा दीर सौरभ हे नाशिकला राहत असताना दीर सौरभ हा पल्लवीला मानसिक त्रास देऊन ,ती झोपलेली असताना तिचे फोटो काढत असे ,आणि बरे वाईट बोलून तिचा शारीरिक छळ करत होता. त्यानंतर तिने ही गोष्ट पतीला सांगितल्यानंतर पती, सासू-सासरे ,यांनी आणखीनच छळ सुरू केला. त्यादरम्यान हर्षवर्धन चे विवाहबाह्य संबंध असल्याचे पल्लवीला कळाल्याने तिने पतीची समजूत काढली .त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली ती बेशुद्ध पडल्यामुळे दवाखान्यात भरती केल्यानंतर सर्व खर्च पल्लवीच्या आई-वडिलांनीच केला. जेव्हा ती दुरुस्त झाली त्यावेळेस तिला सासरच्या मंडळींनी घेऊन जावे असे मुलीचे वडील अनिल साठे यांनी सांगितले मात्र त्यांनी ते ऐकले नाही .शेवटी पल्लवीला सासरे भाऊसाहेब खरात हे जालना येथील कारागृहात कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या शासकीय निवासस्थान आणून सोडले.
दरम्यान काही दिवसातच हर्षवर्धनने पल्लवीला नळावरची मोटर चालू करण्यासाठी याच इमारतीमध्ये राहत असलेल्या कारागृह शिपाई मारुती सोळंके याच्या घरी पाठवले.त्यावेळी सोळंके याने पल्लवी चा हात धरून कमरेवर हात फिरवला, आणि तू खालच्या जातीची आहेस हात फिरवला तर काय झाले असे म्हणत अपमानित केले? हा सर्व प्रकार तिने पतीला सांगितला मात्र पतीने त्याकडे कानाडोळा केला. त्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांनाही हा प्रकार सांगितला. त्यांनी देखील मुलाच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला मात्र त्यांनी देखील,” आम्हाला इथे राहायचे आहे त्यामुळे विनाकारण भांडू नका” असा उलट दम भरला. त्यानंतर पल्लवीची सासू माया भाऊसाहेब खरात यांनी नाशिक येथून आल्यानंतर आपण सोळुंके याच्यासोबत बोलू असे सांगितले. त्यामध्ये काही दिवस गेले त्या परत आल्यानंतर पल्लवीने सासू सोबत सायंकाळी फिरायला जाण्यासाठी विचारणा केली मात्र सासूने नकार दिल्याने ती शेजारी असलेल्या साळवे काकू सोबत फिरायला गेली, आणि येताना थोडा उशीर झाला त्यामुळे सासू-सासर्यांनी आणि नवऱ्याने पल्लवीवर संशय घ्यायला सुरुवात केली, आणि अपमानित केले. हा सर्व प्रकार विचारण्यासाठी दिनांक 23 फेब्रुवारीला दुपारी शेजारी राहणाऱ्या अनिल साळवे व त्यांची पत्नी अशा साळवे यांना घेऊन मारुती सोळंके यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी गेले .त्यावेळी मारुती सोळंके याने पल्लवी खरात हिच्यावरच आरोप करून “तूच मला आकर्षित करीत होती” असे सर्वांच्या समोर सांगितले. त्यामुळे चारित्र्यावरून झालेला हा छळ तिला सहन न झाल्याने तिने दिनांक23 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास साळवे यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये दीर सौरभ भाऊसाहेब खरात, पती हर्षवर्धन भाऊसाहेब खरात, सासू माया भाऊसाहेब खरात, सासरा भाऊसाहेब विश्वनाथ खरात, आणि मारुती सोळंके या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादवि कलम ३०६, ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी मारुती सोळुंके यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू हे करीत आहेत. दरम्यान पल्लवीने गळफास घेतल्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नाशिक येथून तिचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक आल्यानंतर त्यांनी सासरच्या मंडळींनीच तिला फासावर लटकवले असावे असा आरोप केला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com