Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

जीडीसीसी प्रकरण; आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळले ; आरोपींना जावे लागेल उच्च न्यायालयात

जालना- जीडीसीसी प्रकरणातील( ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन) न्यायालयीन कोठडीत असलेले चार आरोपी यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात दांपत्य यांनी देखील अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज असे दोन्ही अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावले आहेत .

त्यामुळे आता या आरोपींना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार आहेत. एकंदरीतच या प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली आहे.
जीडीसीसी अर्थात ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन या प्रकरणामध्ये 16 जानेवारीला गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर चार फेब्रुवारीला पुणे येथील चार आरोपींना आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर या चौघांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचसोबत गुन्हा दाखल झाल्यानंतर किरण खरात दांपत्य फरार आहे आणि त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर वारंवार तारीख वाढत गेली काल दिनांक 3 रोजी या अर्जावर न्यायालयाने सुनावणी घेतली आणि निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज बारा वाजेच्या सुमारास न्यायालयाने दिला आहे, आणि पुणे येथून 4 फेब्रुवारीला ताब्यात घेतलेले चार आरोपी सय्यद इरफान, रमेश उत्तेकर, अमोद मेहतर, आणि व्यंकटेश भोई यांच्यासह खरात दांपत्याचा अर्जही फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची जालना न्यायालयात सुरू असलेली लढाई संपली आहे आणि आता ही लढाई छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयात सुरू होणार आहे.दरम्यान पोलिसांकडून अद्याप पर्यंत या प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल करणे बाकी आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button