लाच गेली, सोने गेले ,पैसेही गेले; पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे अडकले जाळ्यात
जालना- अटकपूर्व जामीन मिळालेल्या तक्रारदाराला वेगळ्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी एक लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने घेतलेली लाचही गेली सोबतचे पैसेही गेले सोने ही गेले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. असे हे पोलीस उपनिरीक्षक आहेत जालना येथील कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वर्ग दोन चे अधिकारी गणेश शेषराव शिंदे.
या प्रकरणातील तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन अर्ज मिळालेला आहे परंतु त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी भादवि कलम 110 न लावता भादवि कलम 107 प्रमाणे कारवाई करून गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी गणेश शिंदे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आज बुधवार दिनांक 12 रोजी तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर शिरसागर यांनी सापळा रचला. जालना येथे तो कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार तक्रारदाराकडून गणेश शिंदे हे 75 हजार रुपयांची लाच घेताना पकडल्या गेले. दरम्यान आपण लाचेच्या सापळ्यात अडकत आहोत हे लक्षात आल्यानंतर गणेश शिंदे यांनी स्वतःच्या वाहनातून पथकाला अडथळा निर्माण करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सापळा पथकाने देखील शिंदे यांच्या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान रस्त्यातच शिंदे यांनी लाचेची स्वीकारलेली 75 हजार रुपयांची रक्कम फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही सापळा अधिकाऱ्यांनी वाहनाचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता रोख नऊ लाख 41 हजार 950 रुपये आणि सुमारे 25 तोळे सोने गणेश शिंदे यांच्या गाडीमध्ये सापडले आहे. याप्रकरणी कधी जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com