Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

“मन की बात” पंतप्रधानांची;”अंदर की बात” भावी नगराध्यक्षांची !

जालना- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शंभरावी “मन की बात” सांगितली आहे . याच निमित्ताने जालन्यात देखील माजी नगरसेवकाने “अंदर की बात” आज सगळ्यासमोर उघडी केली आहे. ती म्हणजे भावी नगराध्यक्ष होण्याची !ते आहेत भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा चे माजी नगरसेवक अशोक पांगारकर.मन की बात हा कार्यक्रम झाल्यानंतर भावी नगराध्यक्ष म्हणून अशोक पांगारकर यांचा उल्लेख असलेले बॅनर्स झळकत होते. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीची ही तयारी असावी असे समजले तर चुकीचे ठरणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या मन की बात कार्यक्रमानिमित्त मुक्तेश्वर लॉन्स येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एका भरगच्च हॉलमध्ये कालपासूनच या कार्यक्रमाची तयारी केली होती. काल सायंकाळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या आणि आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते याचे बक्षीस वितरणही करण्यात आले. दरम्यान आज हा पूर्ण कार्यक्रम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे बसूनच पाहिला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कला शिक्षक तथा व्यंगचित्रकार संजय देशपांडे यांच्या “बेटी बचाव बेटी पढाव” या जनजागृती मोहिमेच्या चित्र प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. आजच्या या कार्यक्रमाला अशोक पांगारकर विनायकरावं देशपांडे,अरुणा फुलमामडीकर,दीपा बिन्नीवाले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button