आई-वडिलांसमोर शासकीय अधिकाऱ्याला झटका देत अल्पवयीन मुलीची प्रियकरा सोबत “धूम”
जालना-बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये शासकीय महिला राज्यगृहात ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीने शासकीय अधिकारी आणि आई-वडिलांसमोर प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना दि.1 मे च्या दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
अंबड तालुक्यातील एक सतरा वर्षे 11 महिन्याची अल्पवयीन मुलगी दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये अंबड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पोस्को कायद्यांतर्गत तिला महिला राज्यगृहाकडे सोपविण्यात आले होते.
दरम्यान या मुलीने जिल्हा परीक्षा अधिकारी तथा मागील एक वर्षांपासून शासकीय महिला राज्यगृहाचे अधीक्षक यांच्याकडे आई-वडिलांकडे सोपवावे यासाठी अर्ज केला होता या अर्जाच्या अनुषंगाने अधीक्षकांनी मुलीच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन बालकल्याण समितीच्या उपस्थितीमध्ये आई-वडिलांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती त्याच दरम्यान मुलीने वडिलांना दुसऱ्या कामात गुंतवत ठेवत अधीक्षकांच्या हाताला झटका दिला आणि जवळच उभ्या असलेल्या नागोबाची वाडी येथील तरुणाच्या दुचाकी क्रमांक एम एच 21 जी एल 4096 वरून धूम ठोकली .मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आणि ती सध्या महिला राज्यगृहाच्या ताब्यात असल्यामुळे अधीक्षकांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.
बालिका सुधार गृहाची गरज
जालना मध्ये बालिका सुधार गृह नसल्यामुळे अशा अल्पवयीन मुलींना महिला राज्य सुधार रहात ठेवावे लागते त्यामुळे इथे असलेल्या इतर महिलांच्या संगतीत या मुली सुधारण्यापेक्षा जास्त बिघडतच आहेत याचाच परिणाम काही दिवसापूर्वी देखील अशाच पद्धतीने मुली पळून जाण्यामध्ये झाला होता यासंदर्भात नुकत्याच जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्यासमोर देखील हा प्रश्न उपस्थित केला होता मात्र त्यांनी देखील अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे मान्य केले होते आणि पुढील पंधरा दिवसांमध्ये यामध्ये सुधारणा होईल असे सांगितले होते मात्र त्यांच्या या दौऱ्याला दोन महिने झाले मात्र पुढे काहीच होईना
महिला राज्यगृह एका खाजगी इमारतीमध्ये आहे दोन मजली इमारतीसाठी सरकार लाखो रुपयांचे भाडं देत आहे मात्र या इमारतीला संरक्षण भिंत नसल्यामुळे मुली आणि महिलांना पळून जाण्यासाठी इथे वाव मिळत आहे तसेच दोन मजली इमारत असल्यामुळे खिडक्यांमधून बाहेरच्या व्यक्तींसोबत संपर्क करता येतो त्यातूनच कालचा हा प्रकार घडला असावा,इमारत सुरक्षित नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे,आणि याचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी फुटत आहे. या राज्यगृहात प्रवेश करण्यासाठी लोखंडी पायऱ्यांवरून चढावे लागते . राज्य गृहातच प्रवेश होतो. त्यामुळे इथे आज भेटायला येणाऱ्या नातेवाईकांनी थांबायचे कुठे आणि आल्या गेल्याची नोंद करायची कुठे हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे? या मुलीला ज्यावेळी आई-वडील न्यायला येणार होते त्याचवेळी या मुलीचा प्रियकर देखील तिथे उपस्थित होता याचाच अर्थ या मुलीचे आणि प्रियकराचे पूर्वीच नियोजन ठरलेले होते.
एक महिना दम नाही पडला.
मुलीचे वय 17 महिने 11 आहे. ती अजून 31 दिवस थांबली असती तर ती सज्ञान झाली असती आणि तिच्या विवाहाला कोणीही थांबू शकले नसते. महिला राज्यगृहाचे अधीक्षक श्री.कनगरे यांच्या हाताला झटका देऊन मुलगी पळाल्यामुळे कनगरे हे जमिनीवर पडले आणि त्यांना किरकोळ दुखापतही झाले आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com