सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा आंतरजातीय विवाह
जालना- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने नऊ आंतरजातीय विवाहा सह 46 सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा शनिवारी पार पाडला.
जैन विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे, छत्रपती संभाजीनगर येथील धर्मादाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार, धर्मदाय वकील संघाचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत वरुडीकर, धर्मादाय वकील संघाचे जिल्हाध्यक्ष पी.डब्ल्यू. कुलकर्णी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांची यावेळी उपस्थित होते.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त विनय मेंढे, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सुदाम सदाशिवे, सहसचिव विमल आगलावे, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माच्या परंपरेनुसार हा विवाह सोहळा पार पाडला. यामध्ये हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म बौद्ध धर्म यांचा समावेश होता.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com