जालना- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती? हे समजावून सांगण्यासाठी वीर सावरकरांच्या साहित्याच्या अभ्यासिका,वाचक तथा व्याख्याता नाशिक येथील गीता उपासनी यांच्या व्याख्यानाचे दिनांक 28 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 140 व्या जयंतीनिमित्त सावरकर प्रेमी मित्र मंडळाचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जुना जालना भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये सायंकाळी सात वाजता हे व्याख्यान होणार आहे. वीर सावरकरांचे हिंदुत्व त्यासोबत सामाजिक, राजकीय, तात्विक, धार्मिक तसेच सांस्कृतिक विचारांची चिकित्सा आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com