जालना-हरलेल्या क्षणाला कवटाळून बसू नका आणि परिस्थितीला दोष देणे बंद करा! असा महत्त्वाचा सल्ला शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.रंजन गर्गे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. बदलाचा संबंध प्रामुख्याने विचारधारेशी कसा असतो? हे समजावून सांगण्यासाठी ते आज विद्यार्थ्यांमध्ये बोलत होते. जालना एज्युकेशन फाउंडेशन अगस्त फाउंडेशन मराठी विज्ञान परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यामाने आठवी, नववी ,दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयातील उत्सुकता त्याची,त्यांना न सापडलेली उत्तरे आणि भारावून सोडणारे प्रश्न या सर्वांचा उहापोह करण्यासाठी विज्ञानाच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी” विज्ञान छंद शिबिर” या तीन दिवसीय शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे, शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. मामा चौकामध्ये सध्या हे शिबिर सकाळी नऊ ते चार अशा पद्धतीने सुरू आहे. काल पहिल्या दिवशी उद्घाटन शिबिरानंतर नंतर संजय टिकारिया यांच्या, “चला आपण प्रयोग करूया” दुपारी डॉ. जी. बी. कुलकर्णी यांचे”वनस्पती शास्त्र- प्रयोग व आकलन” आणि सायंकाळी डॉ.श्रीनिवास औंधकर यांचे “सूर्यमाला व अंतराळाची सफर” या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आज दिनांक 28 रोजी ,जीवनामध्ये बदल ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे, बदलांवरच सर्व आयुष्य अवलंबून असतं असं सांगत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचा आधार घेऊन काही महत्त्वाचे सल्ले दिले.
सल्ल्यांमध्ये बदल स्वीकारण्यासाठी काय करणार ?एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्या गोष्टी मधलं आपल्याला काही येतं हे सांगण्याचा प्रयत्न न करता समोरच्या व्यक्तीकडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.* काहीतरी वेगळे करण्यासाठी विषय निवडा* एखादी अडचण सोडविण्यासाठी कोणाची मदत मागा, ती मागताना लाज बाळगू नका. कारण आयुष्यभर मूर्ख राहण्यापेक्षा काही क्षणासाठी मूर्ख झालेलं बरं असतं! त्यामुळे इतर लोक काय म्हणतील याची लाज न बाळगता विषय समजून घेण्यासाठी मदत मागा *एखादा बदल करायचा असेल तर त्याचा आपल्याला त्रास होतो आणि तो त्रास करून घ्यायला शिका* कोणतीही गोष्ट अर्ध्यामध्ये सोडू नका, ती सुरू करण्यापूर्वीच त्या गोष्टीविषयीचा पूर्ण अभ्यास करा* जुन्या गोष्टी सोडून द्या आणि नवीन गोष्टींचा स्वीकार करा* अनेक जण हरलेल्या क्षणाला कवटाळून बसतात, त्यामुळे भविष्यातील उज्वल क्षण हिरावल्या जातात. तसे न करता हरलेल्या क्षणांना सोडून द्या *,आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण परिस्थितीला दोष देत राहतो ही परिस्थिती कधीही विकासाच्या आड येत नाही, त्यामुळे परिस्थितीला दोष देणे बंद करा! असे महत्त्वाचे सल्ले विचारवंतांच्या विचारांचे दाखले देऊन आणि विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गळी उतरविण्याचा डॉ. रंजन गर्गे यांनी आज प्रयत्न केला. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे उद्या याचा समारोप होणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com