Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

वराह पालनाच्या वादातून तरुणाचा खून

बदनापूर-वराह पालनाच्या  दोन कुटुंबात झालेल्या वादातून तिघा तरुणानी एका एकवीस वर्षीय तरुणावर चाकूने पाठीवर वार करून व काठीने मारहाण केल्याने तरुण जागेवर गतप्राण झाला. बदनापूर येथे  भर दिवसा रेल्वे स्टेशन रोड वर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही  घटना घडली. रमेश भीमराव धोत्रे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बदनापूर येथील रेल्वे स्टेशन रोड वर वराह पालन करणारे धोत्रे व डुकरे हे परिवार राहतात,8 जून रोजी वराह पालन च्या कारणावरून रमेश भीमराव धोत्रे वय 21 वर्ष, राजू संभाजी डुकरे,राहुल राजू डुकरे, लखन राजू डुकरे यांच्या मध्ये सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाद झाला. यावेळी काही लोकांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला मात्र ,राजू डुकरे यांनी रमेश चा हाथ धरून पिरगाळला तर राहुल डुकरे याच्या हातात चाकू असल्याने नागरिक बाजूला झाले आणि बघता बघता वाद वाढला.  राहुल ने रमेश च्या पाठीवर चाकूने वार केला तर लखन डुकरे याने तिथे पडलेली काठी उचलून मारहाण केल्याने रमेश हा रक्त बांबड झाला व त्याने काही क्षणातच प्राण सोडले.

सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली असता तात्काळ पोलीस निरीक्षक शिवाजी बन्टेवाड फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले व खून झालेल्या तरुणाचे प्रेत सरकारी रुग्णालयात पाठविले, घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. आघाव यांना दिली, असता आघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणी बदनापूर पोलीस सहाय्यक निरीक्षक साईनाथ रामोड हे करीत आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button