चोऱ्या “तिकडे” आणि पळून यायचा “इकडे” ;छ. संभाजीनगर ते जालना आरोपीचे अप-डाऊन
जालना- छत्रपती संभाजीनगर मध्ये चोरी केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून जालन्यात येऊन राहायचे आणि पुन्हा छत्रपती संभाजी नगरला जायचे. अपडाऊनचा प्रवास मुकुंदवाडी पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या चोरी प्रकरणातील एका आरोपीचा आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 10 एप्रिल रोजी विजय विश्वनाथ काकडे राहणार नालंदा शाळेजवळ यांनी त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये सुमारे 74 हजारांचा मुद्देमाल लंपास झाला होता .या प्रकरणाचा तपास विशेष पथकाचे पोलीस उप निरीक्षक पंकज मोरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती घेणे सुरू केले. त्यानुसार जय भवानी नगर येथील तेराव्या योजनेमध्ये मोकळ्या मैदानात काहीजण सोन्या-चांदीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पंकज मोरे यांना मिळाली .त्यावेळी सापळा लावण्यात आला आणि या सापळ्यामध्ये बबन उर्फ गबऱ्या भागाजी मकळे वय 40 वर्षे राहणार मुकुंदवाडी, अरविंद उर्फ राजू अब्दुल सदाशिव आल्हाट व 24 वर्ष, शिवशाही नगर मुकुंदवाडी, सोमीनाथ अशोक कांबळे वय 23 राहणार ,शिवशाही नगर मुकुंदवाडी. यांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी एक आरोपी अशोक रावसाहेब आल्हाट वय पंचवीस वर्ष हा राहणार जय भवानी नगर येथीलच आहे मात्र चोरी केल्यानंतर तो काही दिवस फरार व्हायचा, आणि जालन्यात येऊन मंगळ बाजार परिसरात राहायचा. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला देखील काल दिनांक 19 रोजी पोलीस उप निरीक्षक पंकज मोरे यांनी जालन्यातून ताब्यात घेतले आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे, नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे ,शैलेंद्र अडियल, यांनी या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com