Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

ढासला येथील शाळेला पहिल्याच दिवशी ठोकले कुलूप; शिक्षकाने विद्यार्थिनीला पळवून नेल्याचा आरोप

बदनापूर- तालुक्यातील ढासला येथील सोनामाता विद्यालयातून शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार पालकांनी करमाड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ढासला (ता.बदनापूर)येथील गावकऱ्यांनी आज पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शिक्षकाला अटक करण्याची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात राहणारी कासनापूर येथील एक विद्यार्थिनी ढासला येथे असलेल्या साईबाबा विद्याविकास समितीच्या सोनामाता हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होती. सन 2023 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत ती पासही झाली, त्यानंतर ती आणि तिचा भाऊ लाडसावंगी येथे एमएससीआयटीच्या वर्गासाठी मोटार सायकल वरून येत असत. दिनांक 12 रोजी सदरील विद्यार्थिनी आणि तिचा भाऊ लाडसावंगी येथे आल्यानंतर भाऊ ट्युशन साठी दुसरीकडे गेला आणि ही विद्यार्थिनी क्लास साठी दुसऱ्या ठिकाणी गेली. दरम्यान ट्युशन सुटल्यानंतर भाऊ तिला घेण्यासाठी आला असता तिच्या मैत्रिणीने आणि शिक्षकांनी ती आज क्लासला आलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिचा भाऊ परत कासनापूर येथे घरी निघून गेला. त्यामुळे सदरील विद्यार्थिनीच्या आईने करमाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या मुलीला शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक महेंद्र साठे, राहणार करमाड तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर. यांचा अधून मधून फोन येत होता व ही विद्यार्थिनी त्यांच्यासोबत फोनवर बोलत होती. या बोलण्याबद्दल विद्यार्थिनीला विचारले असता ती सरांसोबत शाळेच्या विषयावर बोलत असल्याचे सांगायची. परंतु आता या सरांनीच मुलीला कुठेतरी नेले असावे असा संशय दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. सदरील विद्यार्थिनी ही दिनांक 12 जूनला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी लाडसावंगी येथे गेली होती परंतु अद्याप पर्यंत परत आलीच नाही, त्यामुळे शिक्षकानेच फूस लावून पळून नेल्याची तक्रार पालकांनी दिली आहे.
शिक्षकांवर असलेल्या या आरोपाचा फटका शाळेच्या सर्व घटकांवर झाला असून गावकऱ्यांनी आज दिनांक 14 रोजी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले आहे.


आमचा संबंध नाही -मुख्याध्यापक सदरील विद्यार्थिनी ही मार्च 2023 च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे. तत्पूर्वी दिनांक 25 जानेवारीपासून प्रात्यक्षिक, स्नेहसंमेलन आणि अन्य कारणांमुळे बारावीच्या वर्गाला सुट्ट्याच लागल्या होत्या. परीक्षा संपूनही दीड महिना झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी शाळेचा काहीही संबंध नाही. सदरील संस्था ही 1990 पासून सुस्थितीत चालू आहे, आणि सुमारे 700 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत तसेच 18 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येथे नियुक्त करण्यात आलेले आहेत. अशी माहिती या शाळेचे मुख्याध्यापक अशोक बुचकल यांनी दिली आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button