जालना मित्रासोबत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल दिनांक 15 रोजी सायंकाळी घडली जालना तालुक्यातील वाघरुळ येथे घडली.
वाघरूळ येथे बांधकाम करणारे भगवान जाधव यांचे घर आहे. त्यांचा सोळा वर्षाचा मुलगा सुदर्शन भगवान जाधव हा नुकतीच नववीची परीक्षा पास झाला दहावी मध्ये गेला . कदाचित या उत्साहामध्ये सुदर्शन आणि त्याचे तीन मित्र गावातीलच एका खाजगी विहिरीमध्ये पोहायला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुदर्शन सह अन्य तिघांना गावकऱ्यांनी विहिरीकडे जाताना पाहिले होते. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुदर्शन घरी परत आलाच नाही त्यामुळे त्याचा शोध घेणे सुरू झाले आणि या विहिरीच्या बाजूलाच असलेल्या एका झाडीमध्ये सुदर्शन चे कपडे दिसले, त्यामुळे कदाचित सुदर्शन विहिरीमध्ये पडला की काय ?अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु कपड वरच असल्यामुळे हे सर्वच मित्र पोहण्यासाठी गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान परत आलेले तीनही मित्र काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नाहीत.त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे ?हे देखील समजत नाही दरम्यान गावातीलच दगडू बोर्डे ,शुभम जाधव यांनी विहिरीमध्ये गळ टाकून सुदर्शन ला शोधण्याचा प्रयत्न केला असता सुदर्शन चा मृतदेह गळाला लागला आहे. सुदर्शन ला दोन मोठे भाऊ आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावरून जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास बीट अंमलदार संदीप उगले हे करीत आहेत. दरम्यान सुदर्शन च्या पुढील प्रक्रियेसाठी गावचे माजी सरपंच विकास बोर्डे ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव यांनी प्रयत्न केले.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com दिलीप पोहनेरकर 942221972