Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

..इथे आहे “कण्या आणि डाळ” महाप्रसादाची 111 वर्षांची परंपरा

जालना- भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा आहेत. विशेष करून धार्मिक ठिकाणांमध्ये या प्रथा परंपरा प्रकर्षाने पाहायला मिळतात .अशीच एक परंपरा सुरू आहे ती जालना तालुक्यात असलेल्या नव्हा इथे असलेल्या रंगनाथ महाराज विश्रांती मठामध्ये. गेल्या 111 वर्षांपासून या मंदिरात दरवर्षी होणाऱ्या उत्सवामध्ये बाजरीच्या कन्या आणि डाळ याच्या महाप्रसादाची प्रथा आहे. शनिवार दिनांक 8 रोजी हा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

संस्थांनच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषी महाविद्यालय सुरू करून, आता शिक्षण क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. याविषयी माहिती देताना संस्थांनचे अध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले,” संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासोबतच धार्मिक शिक्षण मिळावे म्हणून इथे वारकरी प्रशिक्षण शाळा सुरू करण्यात आली आहे, आणि त्याच जोडीला परिसरातील विद्यार्थ्यांना संस्थानाचा आणि संस्थांनच्या उपक्रमांचा फायदा व्हावा म्हणून कृषी महाविद्यालय देखील सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून प्रशिक्षण घ्यावे आणि शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी हा या मागचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान संस्थांनच्या या प्रसादाबद्दल उपाध्यक्ष अरुण इंगोले यांनी,” ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. त्याकाळी भाविकांमध्ये, भक्तांमध्ये आपल्या श्रद्धास्थानाला प्रसाद अर्पण करण्यासाठी गोड पदार्थ खरेदी करण्याची आर्थिक स्थिती नव्हती, त्यामुळे अनेक भाविक नाराज असायचे. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घरात असलेल्या “कन्या आणि डाळ” हा प्रसाद अर्पण करून भाविकांना आनंद मिळावा. हा या मागचा महाराजांचा उद्देश होता आणि तीच प्रथा आजही 111 वर्षानंतर कायम असल्याचे श्री.इंगोले यांनी सांगितले.

जालना तालुक्यात  जालना ते सिंदखेड राजा महामार्गावर असलेल्या या आनंदी आत्मानंद सरस्वती उर्फ रंगनाथ महाराज विश्रांती मठ, याचे विश्वस्त मंडळ म्हणून सध्या चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष अरुण इंगोले, सचिव विश्वनाथ यादव, कोषाध्यक्ष रामदास शिंदे, सहसचिव लक्ष्मणराव कुलकर्णी तर विश्वस्त म्हणून एड. मधुकर लिंगायत, वर्धमान डहाळे, अशोक शेळके यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button