संताप जनक; जैन साधूची हत्या करून तुकडे फेकले विहिरीत; जालन्यात निवेदन
जालना कर्नाटक राज्यामध्ये जैन साधू आचार्य श्री काम कुमार नंदजी गुरुदेव यांची हत्या करण्यात आली या हप्तेचा निषेध आणि आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी करणारे निवेदन सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात हिरेकुडी येथे आश्रम आहे. या आश्रमामध्ये जैन साधू आचार्य कामकुमारनंद महाराज हे थांबलेले होते .दिनांक पाच जुलै रोजी त्यांची अज्ञात समाजकंटकांनी लाईटचा शॉक देऊन आणि नंतर कपडे फाडून त्यांचा खून केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांच्या शरीराचे वेगवेगळे तुकडे करून ते एका विहिरीत फेकून दिले आहेत. कर्नाटक सरकारने दोन आरोपींना पकडलेली आहे परंतु यावरच न थांबता सरकारने या आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी सर्व पावले उचलावीत आणि यापुढे कोणत्याही धर्माच्या साधुसंतांची हत्या होऊ नये याकरिता सकल जैन समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या हत्याकांडाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे. खरं तर “जगा आणि जगू द्या” या अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा संदेश जैन समाज देतो. परंतु त्याच समाजाच्या साधुसंतांची हत्या होत असेल तर ही निंदनीय बाब असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्यासाठी सकल जैन समाजाचे अध्यक्ष माणिकचंद कासलीवाल, भरत जैन, महेंद्र सावजी, योगेश पाटणी, धनराज जैन, संजय मुथा, हुकुमचंद पाटणी, संजय लव्हाडे, एड. ऋषभचंद माद्रप, दीपक बाकलीवाल, प्रवीण पहाडे, आदींची उपस्थिती होती.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172