Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

कपडे काढून चोरटा लपला लिंबाच्या झाडावर: गावकऱ्यांनी दिला चोप

जालना- पोलीस आणि गावकरी आपला पाठलाग करत आहेत या भीतीपोटी चोरट्यांनी कपडे काढून झाडावर लपून बसण्याचा पर्याय शोधला, परंतु गावकऱ्यांनी त्यांना पकडून चांगला चोप दिला तोपर्यंत पोलीसही पोहोचले आणि या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. काल दि.7 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यात चंदनझीरा आणि बदनापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

नाशिक जिल्ह्यातील घोटी येथून एक तवेरा गाडी चोरीला गेली आणि ती बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून बदनापूर पोलीस या गाडीचा पाठलाग करत असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी जालना कंट्रोलला दिली. जालना कंट्रोल ने ती चंदनझीरा पोलिसांनी दिली.  ही माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र ताग वाले परमेश्वर हिवाळे हे जालन्याकडून  या गाडीच्या मागावर निघाले. दरम्यानच्या काळात या दोन्ही चोरट्यांना बदनापूर पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी सेलगाव येथून आपली गाडी जवसगाव, हलदूला या ग्रामीण भागाकडे वळवली. या भागातून जात असताना या गाडीचा वेग 120 किलोमीटर 140 किलोमीटर प्रति तासाचा होता. त्यामुळे गावकरी देखील भयभीत झाले होते आणि नेमका हा काय प्रकार आहे हे शोधण्यासाठी त्यांनी देखील आपल्या दुचाकी या गाडीच्या मागे लावल्या .अशा परिस्थितीमध्ये सुसाट निघणाऱ्या या चार चाकी ला एका आडवळणावर पुढे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे त्यांनी ती गाडी तिथेच सोडली आणि डाळिंब , मोसंबीच्या शेतात लपून बसण्याचा प्रयत्न केला. अंगावरील कपडे फेकून देऊन एक जण लिंबाच्या झाडावर लपून बसला परंतु गावकऱ्यांनी त्याला शोधले आणि चांगला चोप दिला, तोपर्यंत समोरून येणारे चंदनझीरा पोलीस आणि पाठीमागून येणाऱ्या बदनापूर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे .मिळालेल्या माहितीनुसार यापैकी एक जण अनिल संपत वारे राहणार जाफराबाद तर दुसरा हर्षद भगवान गंगातिवरे राहणार चंदंनझीरा, जालना अशी त्यांची नावे आहेत. आरोपी पकडल्याची माहिती नाशिक पोलिसांना दिली आहे, आणि त्यानुसार तेथील पोलिसांचे पथक येऊन हे वाहन आणि आरोपी ताब्यात घेऊन गेले आहेत.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button