जालना – उद्योजक होण्यासाठी संघ बांधणी, संकल्पना, हिशोब ठेवणे, योग्य वेळ निवडणे ,आपल्या वस्तूची गुणवत्ता राखणे ,त्यासोबत सर्वांना सोबत घेऊन विचार विनिमय करणे हे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर उद्योगातून मिळालेला नफा हा माझा एकट्याचा नाही त्यामुळे तो मी सर्व खिशात घालणार नाही आणि सर्वांशी कृतज्ञता ठेवणे हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर येथील यशस्वी ग्रुपचे कार्यकारी संचालक मिलिंद कंक यांनी व्यक्त केले. डॉ. पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले यांची जयंती “उद्योजक दिन” म्हणून बारवाले महाविद्यालयात साजरी करण्यात आली याप्रसंगी बोलत होते.
बारवाले महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवार दिनांक 14 रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या फवारणी यंत्राची निर्मिती करून, उद्योग उभा केलेल्या योगेश गावंडे यांनी त्यांची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली. त्यासोबत रितेश मिश्रा यांनी स्टार्टअप साठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला उषा झेर ,उद्योजक सुनील रायठ्ठा, अरुण अग्रवाल, बनवारीजी बगडिया, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर कविता प्राशर यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. पवन देशमुख, मिलिंद कुलकर्णी, नरेंद्र देशमुख, सुरेश खरात, रवी काळे ,चरण पाटील यांनी सहकार्य केले. कुमारी केतकी तुपे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172