Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

रा.काँ.च्या (अ.प.गट) जिल्हाध्यक्षपदी माजीआ.अरविंदराव चव्हाण

मुंबई- जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारशी वरून आज (दि.17) रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी नियुक्ती केली आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ.सतिश चव्हाण, शिक्षक आ.विक्रम काळे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,माजी नगरसेवक रशिद पहेलवान यांची उपस्थिती होती. पक्ष वाढीसाठी व पक्षाचे ध्येय धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपली जालना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. याप्रसंगी जालना शहर अध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रशिद पहेलवान यांची ही नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button