Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मदतनिसांची यादी लागली; 34 जागांसाठी 681 अर्ज

जालना- बाल विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या नागरी प्रकल्पातील मदतनीस या पदासाठी मागील महिन्यामध्ये अर्ज मागविण्यात आले होते. केवळ साडेपाच हजार रुपये मानधन असलेल्या या पदासाठी पदवीधर, बीएड,डीएड, उमेदवारांनी अर्ज केले होते. जिल्ह्यामध्ये एकूण 34 जागा आहेत आणि त्यासाठी 681 अर्ज आले होते. गुणाानुक्रमे निवड समितीने या अर्जांची छाननी करून निवड यादी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी बालविकास प्रकल्प कार्यालयात आणि संबंधित ठिकाणच्या नगरपंचायत महानगरपालिका ,नगरपालिका, कार्यालयात लावली आहे .पुढील दहा दिवसांमध्ये या यादीवर आक्षेप मागविण्यात आले आहेत आणि त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी सुधारित यादी प्रसिद्ध करून संबंधितांना हजर होण्याच्या आदेश दिल्या जातील.

या सर्व जागा नागरि प्रकल्पासाठी आहेत म्हणजेच ज्या ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायत आहे अशा शहरांसाठीच आहेत. त्यानुसार जालना 11 ,बदनापूर तीन, जाफराबाद 10, घनसावंगी चार ,मंठा 3 ,परतुर दोन, अंबड एक, असे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या जागांसाठी जालना 485, बदनापूर 43, जाफराबाद 71 ,घनसावंगी 23 ,मंठा 21 ,परतुर 14, आणि अंबड 24 असे एकूण 681 अर्ज संबंधित विभागाला प्राप्त झाले होते .यामध्ये बारावीचे गुण डीएड, बीएड, आणि इतर काही परीक्षांचे गुण ग्राह्य धरण्यात आले आहेत .त्यानुसार सर्वप्रथम उमेदवार हा 79 टक्के गुण मिळवून यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नवनाथ वामन यांनीही यादी जाहीर केले आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button